अनिकेत विश्वासराव आणि पल्लवी पाटील दिसणार तू तिथे असावे या चित्रपटात
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2017 16:13 IST2017-06-16T11:04:19+5:302017-06-17T16:13:50+5:30
अनिकेत विश्वासराव नुकताच पोस्टर बॉइज, पोस्टर गर्ल, बघतोस का मुजरा कर यांसारख्या चित्रपटांमध्ये झळकला होता तर पल्लवी पाटील क्लासमेट्स ...

अनिकेत विश्वासराव आणि पल्लवी पाटील दिसणार तू तिथे असावे या चित्रपटात
अ िकेत विश्वासराव नुकताच पोस्टर बॉइज, पोस्टर गर्ल, बघतोस का मुजरा कर यांसारख्या चित्रपटांमध्ये झळकला होता तर पल्लवी पाटील क्लासमेट्स या चित्रपटात पाहायला मिळाली होती. प्रेक्षकांना पहिल्यांदाच अनिकेत आणि पल्लवीची जोडी पाहायला मिळणार आहे. अनिकेत आणि पल्लवी तू तिथे असावे या चित्रपटात एकत्र झळकणार आहेत. अनिकेत आणि पल्लवीची जोडी प्रेक्षकांना आवडेल अशी या चित्रपटाच्या टीमला खात्री आहे.
![]()
जीवनानुभव देणाऱ्या चित्रपटांचे प्रेक्षकांनी नेहमीच चांगले स्वागत केले आहे. जी कुमार पाटील एंटरटेण्मेंट प्रस्तुत तू तिथे असावे हा असाच समृद्ध करणारा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा मुहूर्त नुकताच कलाकार, तंत्रज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत नागपूरमध्ये संपन्न झाला. या चित्रपटाची निर्मिती गणेश पाटील यांची असून या चित्रपटाचे दिग्दर्शन संतोष गायकवाड करत आहेत.
एखादा क्षण किंवा घटना आपले आयुष्य क्षणार्धात बदलू शकते, अशावेळी खंबीरपणे उभे राहत आपली स्वप्नं साकारणाऱ्या एका जिद्दी तरुणाची कहाणी तू तिथे असावे या चित्रपटात मांडण्यात आली आहे. हा सिनेमा प्रेक्षकांच्या थेट हृदयाला भिडेल असा विश्वास निर्माते आणि दिग्दर्शक यांनी याप्रसंगी व्यक्त केला.
तू तिथे असावे या चित्रपटात अनिकेत आणि पल्लवीसोबतच विजय पाटकर, समीर धर्माधिकारी, मास्टर तेजस पाटील हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. तर या चित्रपटाची पटकथा व संवाद आशिष राखुंडे यांचे आहेत. संगीत दिनेश अर्जुना यांनी दिले आहे तर रोहीतोष सरदारे चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत.