तथास्तु... मराठीतला पहिला सायलेंट थ्रिलर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2016 13:24 IST2016-11-24T13:24:15+5:302016-11-24T13:24:15+5:30

 प्रेक्षकांची अभिरुची लक्षात घेत झी टॅाकीजने आजवर अनेक दर्जेदार व उत्तमोत्तम कार्यक्रमांची मेजवानी रसिकांना दिली आहे. नेहमीच नाविन्याच्या शोधात ...

And so ... the first silent thriller in Marathi | तथास्तु... मराठीतला पहिला सायलेंट थ्रिलर

तथास्तु... मराठीतला पहिला सायलेंट थ्रिलर

 
्रेक्षकांची अभिरुची लक्षात घेत झी टॅाकीजने आजवर अनेक दर्जेदार व उत्तमोत्तम कार्यक्रमांची मेजवानी रसिकांना दिली आहे. नेहमीच नाविन्याच्या शोधात असलेल्या मराठी प्रेक्षकांसाठी झी टॅाकीजने एक वेगळा प्रयत्न केला आहे. तथास्तु या मराठीतल्या पहिल्या सायलेंट थ्रिलर चित्रपटाची निर्मिती करीत प्रेक्षकांसाठी हटके ट्रीट झी टॅाकीज घेऊन येत आहे. तथास्तु हा मराठीतला पहिला सायलेंट थ्रिलर ठरणार आहे. एकही संवाद नसलेल्या या चित्रपटाची सशक्त कथा-संकल्पना, कलाकारांचे लाजवाब परफॉर्मन्स आणि तंत्रकुशल दिग्दर्शन हे तथास्तु चे ‘युएसपी’ आहेत. संदीप पाठक, माधवी निमकर या कलाकारांच्या अदाकारीने हा एक तासाचा चित्रपट प्रेक्षकांना नक्कीच खिळवून ठेवेल यात शंका नाही या चित्रपटाचे प्रसारण शनिवार ३ डिसेंबर रात्री १०.०० वा. व रविवार ४ डिसेंबर रात्री १०.०० वा. केले जाणार आहे. तथास्तु चित्रपटाच्या निमित्ताने मराठीतल्या या वेगळ्या प्रयोगाचे प्रेक्षक निश्चितच स्वागत करतील असा विश्वास झी टॅाकीजने व्यक्त केला आहे. शनिवार ३ डिसेंबर रात्री १०.०० वा. व रविवार ४ डिसेंबर रात्री १०.०० वा. तथास्तु सिनेमाचा थरार झी टॅाकीजवर नक्की अनुभवा.

Web Title: And so ... the first silent thriller in Marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.