...अन् त्याने चक्क केसांमध्ये आर्चीचे चित्र रेखाटले !!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2016 13:35 IST2016-07-16T08:05:05+5:302016-07-16T13:35:05+5:30

सैराट चित्रपटामुळे रातोरात स्टार झालेली आर्चीची एक झलक पाहण्यासाठी चाहते तरुणांची अक्षरश: अल्लोट गर्दी होत आहे. तिच्या चाहत्यांची संख्या ...

... and he draws pictures of Archie in very fine hair !!! | ...अन् त्याने चक्क केसांमध्ये आर्चीचे चित्र रेखाटले !!!

...अन् त्याने चक्क केसांमध्ये आर्चीचे चित्र रेखाटले !!!

राट चित्रपटामुळे रातोरात स्टार झालेली आर्चीची एक झलक पाहण्यासाठी चाहते तरुणांची अक्षरश: अल्लोट गर्दी होत आहे. तिच्या चाहत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून कित्येक फॅन तिच्यावर प्रेम करु लागले आहेत. असाच एक आर्चीचा प्रेमवेडा ज्याने तिचे चित्र चक्क आपल्या डोक्यावर रेखाटले. 
ओंकार कांबळे असं या फॅनचं नाव असून, त्याने चक्क केसांमध्ये आर्ची चित्र रेखाटलं आहे. महत्त्वाचं म्हणजे ही जादूई कला, कराडच्या संतोष काशीदने रेखाटली आहे.
ओंकार हा साताऱ्याचा रहिवाशी आहे. त्याने तब्बल ३७ वेळा सैराट सिनेमा पाहिला आहे. कराडमधील ओगलेवाडीत संतोष काशीदचं सलून आहे. संतोषच्या हातात जादूई कला असल्याची ख्याती परिसरात पसरली आहे. संतोष कोणाचाही चेहरा हुबेहुब डोक्यावर रेखाटतो.

ओंकारला जेव्हा याबाबतची माहिती समजली, तेव्हा तो संतोषचा पत्ता शोधत ओगलेवाडीत पोहोचला. डोक्यात संचारलेलं आचीर्चं भूत डोक्यावर उतरवण्यासाठी तो साताऱ्यातून संतोषच्या दुकानात आला.

‘मला डोक्यावर आर्ची साकारायची आहे’, ही फर्माईश त्याने संतोषला काशीदला सांगितली.

मग संतोषची कैची हळूहळू ओंकारच्या डोक्यावरुन फिरु लागली. हळूहळू डोक्यावर आचीर्चं चित्र साकारु लागलं. तब्बल अडीच तासाच्या अथक कौशल्यानंतर आचीर्चं रुप ओंकारच्या डोक्यावर साकारलं.

Web Title: ... and he draws pictures of Archie in very fine hair !!!