कमालच केली राव! अमृता खानविलकर झाली फिटनेस फ्रिक, तिचे योगा पोज पाहून व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2021 03:46 PM2021-05-31T15:46:41+5:302021-05-31T15:47:08+5:30

नेहमी ग्लॅमरस फोटो टाकणाऱ्या अमृताने योगा पोजमधील फोटो शेअर करून आपल्या चाहत्यांना चकीत केले आहे.

Amruta Khanwilkar became a fitness freak, you will be surprised to see her yoga pose | कमालच केली राव! अमृता खानविलकर झाली फिटनेस फ्रिक, तिचे योगा पोज पाहून व्हाल थक्क

कमालच केली राव! अमृता खानविलकर झाली फिटनेस फ्रिक, तिचे योगा पोज पाहून व्हाल थक्क

googlenewsNext

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर बऱ्याचदा तिच्या ग्लॅमरस फोटो आणि आगामी प्रोजेक्टमुळे चर्चेत येत असते. ती सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते. मात्र यावेळेला तर तिने सोशल मीडियावरील आपल्या चाहत्यांना चकीत केले आहे. नेहमी ग्लॅमरस फोटो टाकणाऱ्या अमृताने योगा पोजमधील फोटो शेअर करून आपल्या चाहत्यांना चकीत केले आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.


अमृता खानविलकरने नुकतेच इंस्टाग्रामवर योगा पोजमधील व्हिडीओ शेअर करत लिहिले होते की, नवीन सीरिज, लवकरच येणार. या पोस्टमधून लक्षात येते आहे की अमृता योगा पोझमधील फोटो शेअर करून आपल्या चाहत्यांना फिट राहण्यासाठी प्रेरीत करणार आहे.


अमृता खानविलकर योगाचे धडे रसिका क्षिरसागरकडून गिरविते आहे. तिने योगा पोझमधील फोटो शेअर करत म्हटले की, तुम्ही विचार करता त्यापेक्षा तुम्ही मजबूत असता. असे माझ्या शिक्षिका सांगतात. रसिका क्षिरसागर मी तुझी आभारी आहे माझ्यासोबत असण्यासाठी आणि मला प्रशिक्षण देण्यासाठी.


दुसऱ्या योगा पोझमधील फोटो शेअर करून अमृताने लिहिले की, सर्व काही शक्य आहे, यावर विश्वास ठेवा.


आणखी एक फोटो शेअर करत म्हटले की, सोपे काहीच नसते, मजबूत बनता. 


अमृता खानविलकरच्या या फोटो आणि कॅप्शनमधून लक्षात येते की ती फिटनेस फ्रिक झाली आहे. तिच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळते आहे आणि ते तिच्या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव करत आहे.


अमृता खानविलकरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर शेवटची ती मराठी चित्रपट चोरीचा मामलामध्ये झळकली होती. यात तिच्यासोबत जितेंद्र जोशी, क्षिती जोग, हेमंत ढोमे हे कलाकार मुख्य भूमिकेत होते. तर आगामी चित्रपट पाँडिचेरीमध्ये दिसणार आहे. या सिनेमात अमृता सोबत सई ताम्हणकर व वैभव तत्ववादी आणि नीना कुलकर्णी दिसणार आहेत.

Web Title: Amruta Khanwilkar became a fitness freak, you will be surprised to see her yoga pose

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.