केदारनाथला पोहोचली मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर, शेअर केले फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 11:10 IST2025-06-19T11:07:44+5:302025-06-19T11:10:00+5:30

अमृता खानविलकर सध्या उत्तराखंडमध्ये आहे. देवभूमी मानल्या जाणाऱ्या उत्तराखंडमधील केदारनाथ धामला अमृता पोहोचली आहे.

amruta khanvilkar took blessing of kedarnath shared photos of uttarakhand | केदारनाथला पोहोचली मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर, शेअर केले फोटो

केदारनाथला पोहोचली मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर, शेअर केले फोटो

उत्तराखंडमधीलकेदारनाथ धामचे दरवाजे मे महिन्यात उघडले आहेत. त्यामुळे हजारे भाविक केदारनाथमध्ये दाखल होत आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही अनेक भाविक केदारनाथला जात आहेत. काही सेलिब्रिटीही यंदा उत्तराखंडमधील श्री शंकराचे देवस्थान असलेल्या केदारनाथ धामच्या दर्शनाला जात आहेत. महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेता प्रथमेश शिवलकर काही दिवसांपूर्वी केदारनाथला गेला होता. आता मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकरने केदारनाथ गाठलं आहे. 

अमृता खानविलकर सध्या उत्तराखंडमध्ये आहे. देवभूमी मानल्या जाणाऱ्या उत्तराखंडमधील केदारनाथ धामला अमृता पोहोचली आहे. केदारनाथ शिवलिंगाचं दर्शन अमृताने घेतलं आहे. याचे फोटो अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये केदारनाथचं निसर्ग सौंदर्य पाहायला मिळत आहे. 

दरम्यान, अमृता मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. या चंद्रमुखीने अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलं आहे. मराठीसोबतच अमृताने हिंदी सिनेसृष्टीही गाजवली आहे. अमृता सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं दिसतं. काही दिवसांपूर्वीच अमृता जपानमध्ये फिरण्यासाठी गेली होती. याचे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. 

Web Title: amruta khanvilkar took blessing of kedarnath shared photos of uttarakhand