अमृता खानविलकरच्या या अदा पाहिल्यानंतर हटणार नाही तुमची नजर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2020 17:50 IST2020-06-30T17:50:12+5:302020-06-30T17:50:41+5:30

अमृता खानविलकर नेहमीच तिच्या अभिनयासह तिचं सौंदर्य आणि अदा रसिकांना भावतात. त्यामुळे यावेळीही तिच्या या फोटोंना तिच्या चाहत्यांकडून भरपूर लाईक्स आणि कमेंटस मिळत असल्याचे पाहायला मिळते आहे.

Amruta Khanvilkar shared photos on instagram, see her photo | अमृता खानविलकरच्या या अदा पाहिल्यानंतर हटणार नाही तुमची नजर

अमृता खानविलकरच्या या अदा पाहिल्यानंतर हटणार नाही तुमची नजर

 

वाजले की बारा म्हणत तमाम रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलेली मराठमोळी अभिनेत्री म्हणजे अभिनेत्री अमृता खानविलकर. सौंदर्य, अदा, फॅशन आणि अनोख्या स्टायइलने तिने रसिकांवर मोहिनी घातली आहे. अमृताचे फॅन्स तिच्या डान्ससोबतच अदा आणि स्टाईलवर फिदा असतात. मराठीसह हिंदी सिनेमातही आपलं नृत्य आणि अभिनयाची जादू अमृताने दाखवली आहे.

अमृताने नुकतेच इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. तिच्या या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.

सुरुवातीला एक डान्सर म्हणून प्रसिद्ध असलेली अमृता आता मराठीतील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये गणली जाते. अमृतानं तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तिच्या व्हेकेशनचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले होते.फोटोमधील तिचा ग्लॅमरस अंदाज पाहून चाहतेही घायाळ होत असतात.

अमृता खानविलकरचा अभिनय आणि नृत्य यावर रसिक तितकेच फिदा आहेत. मराठी सिनेमांसह अमृताने आपल्या डान्सने छोट्या पडद्यावरही वेगळी ओळख निर्माण केली आहे. पती हिमांशूसह तिने डान्स रियालिटी शो 'नच बलिये'चे विजेतेपदसुद्धा पटकावलं होतं.

लवकरच अमृता पॉन्डेचेरी या सिनेमातून रसिकांच्या भेटीला येणार आहे. सचिन कुंडलकर या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत. कुंडलकर आणि तेजस मोडकने या सिनेमाची कथा लिहली आहे.

या सिनेमाची कथा नेमकी काय हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. मात्र सिनेमाची तगडी स्टारकास्ट रसिकांना आकर्षित करेल. कारण यात अमृता खानविलकरसह सई ताम्हणकर आणि वैभव तत्तववादी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Web Title: Amruta Khanvilkar shared photos on instagram, see her photo