"चिरतरुण व्यक्तिमत्व, वर्ल्ड ट्रॅव्हलर असणारे...", अमृता खानविलकरची 'फादर्स डे'निमित्त खास पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2025 12:43 IST2025-06-15T12:43:23+5:302025-06-15T12:43:59+5:30
"राजू खानविलकरांना भेटा...आमचे पप्पा!", अमृताची पोस्ट

"चिरतरुण व्यक्तिमत्व, वर्ल्ड ट्रॅव्हलर असणारे...", अमृता खानविलकरची 'फादर्स डे'निमित्त खास पोस्ट
आज फादर्स डे निमित्त अनेक जण आपापल्या वडिलांना शुभेच्छा देत आहे. सेलिब्रिटीही वडिलांसोबतचे फोटो शेअर करत आहेत. काही सेलिब्रिटी वडिलांच्या आठवणीत भावुकही झाले आहेत. मराठी अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) अनेकदा तिच्या आईचे व्हिडिओ शेअर करत असते. तिच्या आईचा साधेपणा जो अमृतातही उतरला आहे याची मायलेकीच्या नात्यातून जाणीव होते. आज फादर्स डे निमित्ताने अमृताने वडिलांसोबतचा फोटो शेअर करत पोस्ट लिहिली आहे.
गेल्या वर्षीच अमृता खानविलवकर आईवडिलांसोबत परदेशात फिरायला गेली होती. तेथील अनेक फोटो तिने शेअर केले होते. त्यातलाच एक फोटो पुन्हा पोस्ट करत अमृता लिहिते, "राजू खानविलकरांना भेटा...आमचे पप्पा! चिरतरुण व्यक्तिमत्व(त्यांच्यामुळेच माझी त्वचा इतकी छान आहे). सतत पॉझिटिव्ह राहणारे, सतत भटकणारे, आयुष्याने पण खूप फिरवलं - गिरगांव ते विलेपार्ले ते कोथरुड...पण आता वर्ल्ड ट्रॅव्हलर असणारे! आमचे वडील म्हणून खूप कडक, पण आजोबा म्हणून एक वेगळ्याच ग्रहावरचे वाटतात - नातवंडांशी वेगळ्याच इंग्लिशमध्ये बोलणारे. ज्यांच्या फोनवर सतत अदितीचा फोटो वॉलपेपर म्हणून लावणारे. आमचे पप्पा...हॅपी फादर्स डे".
अमृता खानविकर एकदा वडिलांबद्दल बोलताना मुलाखतीत म्हणालेली की, "मी बाबांच्या वयाची झाल्यावर त्यांच्यासारखा फक्त २ टक्केही आनंद मिळवू शकले तर मी स्वत:ला खूप नशीबवान समजेल. आपण आईबाबांकडून अनेक गोष्टी शिकतो. एकटे राहूनही आपण कसे समाधानी आणि उत्साही असू शकतो हे मी बाबांकडून शिकले."