अमृता खानविलकरचा श्रृंगार पाहून चाहते झाले फिदा, म्हणाले एक लाजरान् साजरा मुखडा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2019 19:06 IST2019-09-03T19:06:05+5:302019-09-03T19:06:37+5:30

अमृता खानविलकर हिने नुकताच गुलाबी रंगाच्या साडीतील फोटो शेअर केला आहे

Amruta Khanvilkar saree look shared on Social media | अमृता खानविलकरचा श्रृंगार पाहून चाहते झाले फिदा, म्हणाले एक लाजरान् साजरा मुखडा...

अमृता खानविलकरचा श्रृंगार पाहून चाहते झाले फिदा, म्हणाले एक लाजरान् साजरा मुखडा...

हिंदी व मराठी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयानं सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री अमृता खानविलकर सोशल मीडियावर अ‍ॅक्टीव्ह असते. वेगवेगळ्या अंदाजातील फोटो ही ती अपलोड करत असून रसिकांची प्रशंसा मिळवताना दिसते. 

अमृता खानविलकर हिने नुकताच गुलाबी रंगाच्या साडीतील फोटो शेअर केला आहे. या फोटोत ती खूपच सुंदर दिसते आहे. हा फोटो शेअर करून तिने श्रृंगार असं कॅप्शन दिलं आहे.


या मराठमोळ्या अंदाजात तिने गणपती बाप्पाचेही आशीर्वाद घेतले आहेत. तिने हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

अमृता खानविलकरचा अभिनय आणि नृत्य यावर रसिक तितकेच फिदा आहेत.  मराठी सिनेमांसह अमृताने आपल्या डान्सने छोट्या पडद्यावरही वेगळी ओळख निर्माण केली आहे. पती हिमांशूसह तिने डान्स रियालिटी शो ‘नच बलिये’चे विजेतेपदसुद्धा पटकावलं होतं.

लवकरच अमृता पॉन्डेचेरी या सिनेमातून रसिकांच्या भेटीला येणार आहे. सचिन कुंडलकर या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत. कुंडलकर आणि तेजस मोडकने या सिनेमाची कथा लिहली आहे. या सिनेमाची कथा नेमकी काय हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. मात्र सिनेमाची तगडी स्टारकास्ट रसिकांना आकर्षित करेल. कारण यात अमृता खानविलकरसह सई ताम्हणकर आणि वैभव तत्तववादी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 


तसेच अमृता ‘खतरों के खिलाडी १०'मध्ये पहायला मिळणार आहे. या शोच्या शूटिंगसाठी ती बल्गेरियाला गेली होती. यंदाच्या सीझनमध्ये अमृता सोबत करण पटेल, अदा खान, करिश्मा तन्ना, आर जे मलिश्का, कोरियोग्राफर धर्मेश व काही सेलिब्रेटी दिसणार आहेत.

मात्र हा शो पाहण्यासाठी चाहत्यांना २०२० पर्यंत प्रतीक्षा करावी लागेल.

Web Title: Amruta Khanvilkar saree look shared on Social media