सारा अली खानच्या 'चकाचक' गाण्यावर थिरकली अमृता खानविलकर; व्हिडीओला मिळतेय पसंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2021 17:39 IST2021-12-13T17:39:25+5:302021-12-13T17:39:51+5:30

Amruta Khanvilkar dance on Chakachak Song: सारा अली खानच्या चकाचक गाण्यावर सध्या रिल्स पाहायला मिळत आहेत. दरम्यान आता अभिनेत्री अमृता खानविलकरदेखील या गाण्यावर डान्स करताना दिसली.

Amruta Khanvilkar on Sara Ali Khan's song 'Chakachak'; Video goes viral | सारा अली खानच्या 'चकाचक' गाण्यावर थिरकली अमृता खानविलकर; व्हिडीओला मिळतेय पसंती

सारा अली खानच्या 'चकाचक' गाण्यावर थिरकली अमृता खानविलकर; व्हिडीओला मिळतेय पसंती

 सारा अली खान (Sara Ali Khan)चा आगामी चित्रपट अतरंगी रे (Atrangi Re)मधील गाणे हल्ली सगळ्यांचाच ओठांवर रुळताना दिसत आहे. माधुरी दीक्षितपासून रणवीर सिंगपर्यंत साराच्या या गाण्यावर दमदार स्टेप्स केले आहे. साराचे 'चकाचक' (Chakachak) हे गाणे खूप व्हायरल होत आहे. या गाण्यावर लोक सातत्याने रिल्स बनवत आहेत. आता मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar)या गाण्यावर थिरकताना दिसते आहे. तिने तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिच्या या व्हिडीओला खूप पसंती मिळताना दिसते आहे. 

खरेतर अमृता खानविलकर अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि तिचा बॉयफ्रेंड विकी जैनच्या लग्नासाठी गेली आहे. तिथले सर्व सेरेमनीमध्ये ती सहभागी झाली आहे. आज अंकिता आणि विकीची हळद समारंभ आहे आणि त्यासाठी अमृता छान तयार झाली आहे. अमृताने पिवळ्या रंगाची साडी आणि त्यावर लाल रंगाचा पफवाला ब्लाउज घातला आहे. कानात मोठे इअरिंग्स यामुळे ती खूपच सुंदर दिसते आहे. तसेच तिने गॉगलदेखील लावलेला दिसतो आहे. तिने चकाचक गाण्यावरील रिल शेअर करत लिहिले की, जेव्हा तुम्हाला तुमच्या आवडत्या साडीला गुडबाय म्हणायचे असते तेव्हा कारण आज हळदी आहे भाईईई.


अमृताच्या या व्हिडीओवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे. फक्त चाहतेच नाही तर सेलिब्रेटीदेखील तिच्या या व्हिडीओवर कमेंट करत आहेत. अभिनेत्री सोनाली खरेने कमेंटमध्ये लिहिले की, एकदम चका चक... अभिनेत्री मृणाल ठाकूरने म्हटले उफ्फ..ही साडी आणि तू... तर एका चाहत्याने लिहिले की, तोड नाही अमृता तुला..तर आणखी एका युजरने म्हटले की सारा अली खानपेक्षा तू जास्त छान डान्स या गाण्यावर केला आहेस.

Web Title: Amruta Khanvilkar on Sara Ali Khan's song 'Chakachak'; Video goes viral