असल्या घातक फोटोशूटसाठी वाघाचं काळीज पाहिजे...! चाहत्याची कमेंट अन् अमृताचं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2021 10:39 IST2021-07-14T10:38:35+5:302021-07-14T10:39:12+5:30

अमृतानं स्वत:चे काही फोटो इन्स्ताग्रामवर शेअर केले. पारंपरिक पेहरावातील तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी भरभरून कमेंट्स केल्यात. एका कमेंट्सवर मात्र सर्वांच्याच नजरा खिळल्या.

amruta khanvilkar gave reply to her fans comment | असल्या घातक फोटोशूटसाठी वाघाचं काळीज पाहिजे...! चाहत्याची कमेंट अन् अमृताचं उत्तर

असल्या घातक फोटोशूटसाठी वाघाचं काळीज पाहिजे...! चाहत्याची कमेंट अन् अमृताचं उत्तर

ठळक मुद्देअमृताने आपल्या अभिनयाच्या जोरावर मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत हक्काचं स्थान निर्माण केलं आहे.

‘वाजले की बारा’ म्हणत तमाम रसिक प्रेक्षकांचं मनं जिंकणारी अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) हिच्या हटके लुकनं चाहते अक्षरश: घायाळ होतात. चेह-यावरचं मनमोहक हास्य आणि दिलखेच अदा पाहून तिच्या पुन्हा पुन्हा प्रेमात पडतात.  अमृता सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. स्वत:चे नवनवीन फोटो ती शेअर करत असते. आता अमृताच्या या फोटोंवर कमेंट्सचा पाऊस पडणार नसेल तर नवल. अमृतानं फोटो शेअर करताच त्यावर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडतो.
तूर्तास तिच्या अशाच फोटोंची चर्चा आहे. या फोटोंसोबत कमेंट्स बॉक्समधील कमेंट्स आणि त्यावर अमृतानं दिलेल्या उत्तरानंही सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

 नुकतंच अमृतानं स्वत:चे पंजाबी स्लीव्हलेस कुर्त्यामधील काही फोटो इन्स्ताग्रामवर शेअर केले. पारंपरिक पेहरावातील तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी भरभरून कमेंट्स केल्यात. एका कमेंट्सवर मात्र सर्वांच्याच नजरा खिळल्या.

 ‘हे असले घातक फोटोशूट करताना वाघाचं काळीज पाहिजे फोटोग्राफरचे,’ असं एका चाहत्यानं अमृताच्या या फोटोंवर कमेंट करताना लिहिलं. आपल्या कमेंटवर अमृताचं उत्तर येईल, अशी अपेक्षाही या चाहत्यानं केली नव्हती. पण इतकी झक्कास आणि मजेशीर कमेंट वाचून अमृतालाही उत्तर देण्याचा मोह आवरता आला नाही. तिनं या कमेंटला अगदी आवर्जुन उत्तर दिलं. ‘आईनं काढलेत फोटो,’ असं उत्तरादाखल तिनं लिहिलं.

अमृताचे इतके सुंदर फोटो तिच्या आईने काढलेत हे वाचून तर चाहतेही थक्क झालेत. अमृताच्या या उत्तरालाही मग अनेकांनी लाईक केले. अनेकांनी अमृताच्या या फोटोंसोबत इतके सुंदर फोटो काढल्याबद्दल तिच्या आईचेही कौतुक झाले.
अमृताने आपल्या अभिनयाच्या जोरावर मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. मराठीमधील  फक्त लढ म्हणा, आयना का बयना,शाळा, वेलकम जिंदगी आणि कटयार काळजात घुसली या चित्रपटांमध्ये तिनं धमाकेदार काम केलं आहे.
 

Web Title: amruta khanvilkar gave reply to her fans comment