अमृता खानविलकरने नवरा आणि सासरच्या मंडळींसोबत सेलिब्रेट केला वाढदिवस, हिमांशू म्हणतो- "गेली २० वर्ष..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2025 16:50 IST2025-11-23T16:50:05+5:302025-11-23T16:50:34+5:30
अमृताने पती हिमांशू आणि सासरच्या मंडळींसोबत वाढिदवस सेलिब्रेट केला. अमृताच्या बर्थडे सेलिब्रेशनता व्हिडीओ हिमांशूने शेअर केला आहे.

अमृता खानविलकरने नवरा आणि सासरच्या मंडळींसोबत सेलिब्रेट केला वाढदिवस, हिमांशू म्हणतो- "गेली २० वर्ष..."
मराठी सिनेसृष्टीतील चंद्रमुखी म्हणजे अमृता खानविलकरचा आज वाढदिवस आहे. अमृता आज तिचा ४१ वा वाढदिवस सेलिब्रेट करत आहे. अमृताच्या वाढदिवशी सोशल मीडियावर शुभेच्छांचा पाऊस पडला आहे. अनेक सेलिब्रिटींनीही तिच्यासाठी खास पोस्ट शेअर करत अभिनेत्रीला शुभेच्छा दिल्या आहेत. अमृताचा पती आणि अभिनेता हिमांशू मल्होत्रानेदेखील अभिनेत्रीसाठी खास पोस्ट शेअर करत तिला शुभेच्छा दिल्या.
अमृताने पती हिमांशू आणि सासरच्या मंडळींसोबत वाढिदवस सेलिब्रेट केला. अमृताच्या बर्थडे सेलिब्रेशनता व्हिडीओ हिमांशूने शेअर केला आहे. या व्हिडीओत अमृता केक कापताना दिसत आहे. तिच्या वाढदिवशी खास डेकोरेशनही केल्याचं दिसत आहे. "हॅपी बर्थडे अमृता. या वर्षात तुला खूप प्रेम, आनंद, खूप सारं यश मिळो. स्वत:साठी उभं राहणं, आयुष्याने आपल्या पद्धतीने जगण्याची क्षमता असणारी आणि ठसा उमटवणारी याचं अप्रतिम उदाहरण आहेस. गेली २० वर्ष आपण एकमेकांना ओळखत आहोत. वेळ कसा गेला हे कळलंच नाही. खूप साऱ्या शुभेच्छा, आशीर्वाद आणि प्रेम", असं हिमांशूने पोस्टमध्ये म्हटलं आहे.
अमृता आणि हिमांशूने २०१५ मध्ये लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नाला १० वर्ष पूर्ण झाली आहेत. त्याआधी काही वर्ष ते एकमेकांना ओळखत होते. अमृता आणि हिमांशू एकमेकांसोबत फार पोस्ट शेअर करत नसले तरी ते त्यांच्या वाढदिवसाला आणि स्पेशल दिवशी कायम एकत्र दिसतात.