अमृताचा नवा अवतार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2016 15:31 IST2016-09-25T10:01:23+5:302016-09-25T15:31:23+5:30

प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री अमृता खानविलकरची स्टाइल सध्या सोशलमीडियावर जोर धरू लागली आहे. रोज अमृताच्या सोशलमीडियावर वेगवेगळया लूक, कॉश्च्युम, हेअरस्टाइलमधील ...

Amrita's new incarnation | अमृताचा नवा अवतार

अमृताचा नवा अवतार

रेक्षकांची लाडकी अभिनेत्री अमृता खानविलकरची स्टाइल सध्या सोशलमीडियावर जोर धरू लागली आहे. रोज अमृताच्या सोशलमीडियावर वेगवेगळया लूक, कॉश्च्युम, हेअरस्टाइलमधील  फोटोंनी अक्षरश: प्रेक्षकांना वेड लागले आहे. तिचे प्रत्येक स्टाइलमधील फोटो हा बॉलिवुड अभिनेत्रींना टक्कर देईन अशाच प्रकारचा पाहायला मिळत आहे. असाच एक झक्कास फोटो अमृताने नुकताच सोशलमीडियावर अपलोड केला आहे. या फोटोमध्ये अमृताने गळयामध्ये टाइट अशा माळा घातल्या आहेत. त्याचबरोबर डोक्यावर क्राऊन असलेला तिचा सुंदर फोटो प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. तसेच अमृताने ही सोशलमीडियावर न्यू अवतार म्हणून फोटोच्याखाली लिहील आहे. या फोटोला प्रेक्षकांनी भरभरून कमेंन्टस दिल्या आहेत. त्याचबरोबर काही चाहत्यांनी तर मार ही डालूंगी असे म्हणत तिच्या सौदर्याचे कौतुक केले आहे.

Web Title: Amrita's new incarnation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.