अमृता रणवीरचा झक्कास सेल्फी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2016 14:33 IST2016-07-23T08:59:29+5:302016-07-23T14:33:16+5:30

                      बॉलीवुडचा मोस्ट चार्मिंग अभिनेता रणवीर सिंग याच्या फॅन्स ...

Amrita Ranveer's Jhakas Selfie | अमृता रणवीरचा झक्कास सेल्फी

अमृता रणवीरचा झक्कास सेल्फी

 
r />                    बॉलीवुडचा मोस्ट चार्मिंग अभिनेता रणवीर सिंग याच्या फॅन्स तर इंडस्ट्रीतील अनेक हिरोईन्स देखील आहेत. दिपिका आणि त्याच्या अफेअरर्सच्या चर्चांना सुदधा आता उधाण आले आहे. अशातच या हॅन्डसम हंकच्या सोबत आपल्या मराठमोळ््या अमृता खानविलकरने एक झक्कास सेल्फी काढला आहे. या फोटोमध्ये अमृता आणि रणवीर दोघेही फारच कुल दिसत आहेत. अमृताने यावेळी ब्लॅक कलरचा सुंदर ड्रेस घातला होता तर रणवीरच्या हटके स्टाईलकडे लक्ष वेधले जात आहे. रेड कलरचा स्वेट शर्ट आणि डोळ््यावर चष्मा असा टोटली डिफरंट अटायर त्याने केला होता. अमृताच्या गळ््यात हात घालुन मस्त मुडमध्ये काढलेल्या या सेल्फीवर या दोघांचेही चाहते फिदा झाले आहेत.

             

सोशल साईट्सवर या फोटोला अनेक लाईक्स मिळत आहे. रणवीरचा हा वेगळा लुक त्याच्या नव्या चित्रपटासाठी आहे का असा प्रश्न देखील हा फोटो पाहताना पडतो. तर रणवीर अन अमृताची ही हॉट जोडी या फोटोत एकत्र पाहुन अमृताला बॉलीवुडमधुन नक्कीच आॅफर्स येऊ शकतील असे वाटते. अमृताने या आधी देखील प्रियांका चोप्रा, अमिताभ बच्चन,माधुरी दिक्षित, आमीर खान यांच्यासोबत एका फ्रेम मध्ये झळकण्याची संधी सोडली नव्हती. परंतू रणवीर सोबतचा तिचा हा सेल्फी लय भारी आल्याचे तिच्या चाहत्यांचे म्हणणे आहे. आता पाहुयात या फोटो नंतर ही जोडी आपल्याला आॅनस्क्रीन पहायला मिळते का. 

Web Title: Amrita Ranveer's Jhakas Selfie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.