अमृता खानविलकरचा विनामेकअप लूक पाहून चाहत्यांसह सेलिब्रेटी झाले फिदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2021 10:47 IST2021-01-26T10:43:53+5:302021-01-26T10:47:11+5:30

राठीसह हिंदी सिनेमातही आपलं नृत्य आणि अभिनयाची जादू अमृताने दाखवली आहे.

Amrita khanwilkar's make-up look viral on social media | अमृता खानविलकरचा विनामेकअप लूक पाहून चाहत्यांसह सेलिब्रेटी झाले फिदा

अमृता खानविलकरचा विनामेकअप लूक पाहून चाहत्यांसह सेलिब्रेटी झाले फिदा

मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकरने सौंदर्य, अदा, फॅशन आणि अनोख्या स्टायइलने रसिकांवर मोहिनी घातली आहे. अमृताचे फॅन्स तिच्या डान्ससोबतच अदा आणि स्टाईलवर फिदा असतात. मराठीसह हिंदी सिनेमातही आपलं नृत्य आणि अभिनयाची जादू अमृताने दाखवली आहे. अमृताने इन्स्टाग्रामवर तिचा विना मेकअप लूकमधला फोटो शेअर केले आहेत. या फोटोत अमृता खूपच स्टनिंग दिसतेय. चाहत्यांसह सेलिब्रेटींना अमृताच्या या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला  आहे.

सुरुवातीला एक डान्सर म्हणून प्रसिद्ध असलेली अमृता आता मराठीतील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये गणली जाते. अमृतानं तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तिच्या व्हेकेशनचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले होते.फोटोमधील तिचा ग्लॅमरस अंदाज पाहून चाहतेही घायाळ होत असतात.

मराठीसह हिंदी सिनेमातही आपलं नृत्य आणि अभिनयाची जादू अमृताने दाखवली आहे..राजी', 'सत्यमेव जयते' , 'मलंग' अशा सिनेमांतून तिने हिंदी सिनेमात आपल्या अभिनयाने रसिकांची मने जिंकली आहेत.लवकरच अमृता पॉन्डेचेरी या सिनेमातून रसिकांच्या भेटीला येणार आहे. सचिन कुंडलकर या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत. कुंडलकर आणि तेजस मोडकने या सिनेमाची कथा लिहिली आहे.

Web Title: Amrita khanwilkar's make-up look viral on social media