नो मेकअप लूकमधील अमृता खानविलकरचा हॉट फोटो सोशल मीडियावर व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2020 07:00 IST2020-05-01T07:00:00+5:302020-05-01T07:00:00+5:30

अमृताने स्वत: नो मेकअप लूकमधील फोटो शेअर केला आहे.

Amrita khanvilkar no make up look photo get viral gda | नो मेकअप लूकमधील अमृता खानविलकरचा हॉट फोटो सोशल मीडियावर व्हायरल

नो मेकअप लूकमधील अमृता खानविलकरचा हॉट फोटो सोशल मीडियावर व्हायरल

मराठी सिनेमांसह अमृताने बॉलिवूडमध्येही आपली ओळख निर्माण केली आहे. 'राजी', 'सत्यमेव जयते' अशा सिनेमांतून तिने हिंदी सिनेमात आपल्या अभिनयाने रसिकांची मने जिंकली. अमृता सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. ती सोशल मीडियावर तिचे फोटो, व्हिडिओ नेहमीच पोस्ट करत असते. अमृताने तिचा नो मेकअप लूकमधील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोत अमृता जास्त हॉट दिसतेय.  या फोटोतील तिच्या सेक्सी अंदावर तिचे फॅन्स फिदा झाले आहेत.

मराठी सिनेसृष्टीत पूर्वीच्या काळात लूक आणि सौंदर्याबाबत तितकेसे प्रयोग केले जात नव्हते. मात्र आता या अभिनेत्री आपल्या लूक, स्टाइल आणि फॅशनबाबत आधीपेक्षा जास्त सजग झाल्या आहेत. त्यामुळेच त्या आधीपेक्षा अधिक बोल्ड आणि ग्लॅमरस दिसू लागल्या आहेत. मराठी अभिनेत्रींच्या करिअरच्या सुरुवातीच्या फोटों आणि सध्याचे फोटोंवर नजर टाकली तर त्यांच्या लूकमध्ये झालेला हा बदल सहजच कुणालाही लक्षात येईल. याच यादीत सगळ्यात जास्त ग्लॅमरस मराठमोळी अभिनेत्री म्हणून अमृता खानविलकर ओळखली जात आहे.

अमृता खानविलकरचा अभिनय आणि नृत्य यावर रसिक तितकेच फिदा आहेत. मराठी सिनेमांसह अमृताने आपल्या डान्सने छोट्या पडद्यावरही वेगळी ओळख निर्माण केली आहे. 

Web Title: Amrita khanvilkar no make up look photo get viral gda