अमित्रियान पाटीलाचा नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2019 15:00 IST2019-01-14T14:51:22+5:302019-01-14T15:00:06+5:30

अभिनेता आमित्रियान पाटीलने राजवाडे अ‍ॅन्ड सन्स, सत्या 2 सह अनेक हिंदी, मराठी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची वेगळी छाप अमित्रियाने सोडली. अमित्रियानचा बॉईज 2 हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला येऊन गेला. 

Amitriyan Patil's new cinema will soon be meeting the audience | अमित्रियान पाटीलाचा नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

अमित्रियान पाटीलाचा नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

ठळक मुद्देराजवाडे अँड सन्स मध्ये विक्रम राजवाडेचा रोल प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला होता अमित्रियाचा 'आसूड - The whip against system' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे

अभिनेता आमित्रियान पाटीलने राजवाडे अ‍ॅन्ड सन्स, सत्या 2 सह अनेक हिंदी, मराठी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची वेगळी छाप अमित्रियाने सोडली. अमित्रियानचा बॉईज 2 हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला येऊन गेला. 

आगामी त्याचे दोन मराठी व दोन हिंदी चित्रपट येणार आहे. त्यात आसूड - The whip against system ह्या धडाकेबाज फिल्म चा समावेश आहे जो 8 फेब्रवारीला रिलीज होतोय. मन्या द वंडर बॉय साठी त्याला दादासाहेब फाळके मराठी फिल्म फेस्टिव्हलमध्ये सर्वोतकृष्ट अभिनयासाठी अवॉर्ड सुद्धा मिळाला. राजवाडे अँड सन्स मध्ये विक्रम राजवाडेचा रोल प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला होता आणि आता त्याच्या आगामी सिनमा आसूड - The whip against system मधल्या  रोल कडे  सगळ्यांचे लक्ष आहे.

या भूमिकेबाबत अमित्रियान सांगतो, ज्यापण भूमिका आजपर्यंत केल्या त्या एकसारख्या नव्हत्या. एकसारखा अभिनय करून पुढे जाणे सोपे असते. मात्र तसे न करता निवडक व आव्हानात्मक भूमिका साकारणे आवडते.' मित्राकडे व्हिसीआर होता. सर्व मिळून पैसे गोळा करून चित्रपट बघायचो. या व्हिसीआरने जीवनाच्या रंगभूमिवरील खर्‍या सिनेमाचा मार्ग दाखविला. लहानपणापासून जे जगलो व जे आता अनुभवतोय त्यात जमीन आसमानचा फरक आहे. त्यामुळे वेगळ्या प्रकारच्या भूमिका आणि वेगळे कथानक असलेले चित्रपट आज माझ्यासाठी प्रायोरिटी बनतात , असेही तो सांगतो. स्वप्नांना मेहनत व निर्णय क्षमतेची साथ दिल्यास यश निश्‍चित मिळते, हा संदेशही तो आपल्या या प्रवासातून देतो.

Web Title: Amitriyan Patil's new cinema will soon be meeting the audience