एखाद्या अभिनेत्री इतकीच सुंदर आहे अभिनेता अमेय वाघची पत्नी, पाहा तिचे हे फोटो !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2020 07:00 IST2020-07-04T07:00:00+5:302020-07-04T07:00:02+5:30

दिल दोस्ती दुनियादारी ही अमेयची मालिका तर प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती

Ameya wagh's wife is beautiful like a actress | एखाद्या अभिनेत्री इतकीच सुंदर आहे अभिनेता अमेय वाघची पत्नी, पाहा तिचे हे फोटो !

एखाद्या अभिनेत्री इतकीच सुंदर आहे अभिनेता अमेय वाघची पत्नी, पाहा तिचे हे फोटो !

मराठी सिनेमा, मालिका, रंगभूमी, वेबसीरिज अशा विविध माध्यमातून आपल्या अभिनयाची छाप पाडणारा अभिनेता म्हणजे अमेय वाघ. आपल्या अभिनयाने अमेयने रसिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे.तो सोशल मीडियावर चाहत्यांशी संवाद साधत असतो. फोटो, व्हिडीओ आणि आपल्या आगामी सिनेमाची माहिती तो सोशल मीडियाच्या माध्यमातून फॅन्सना तो देत असतो.

नुकतीच अमेयच्या लग्नाला तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. त्याने 2 जुलै, 2017 साली त्याची बालमैत्रिण साजिरी देशपांडेसोबत विवाहबंधनात अडकला होता. अमेय साजिरीसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो. साजिरी दिसायला एखाद्या अभिनेत्री इतकीच सुंदर आहे. दोघांची जोडी अमेयच्या फॅन्सनादेखील चांगलीच आवडते. १३ वर्षांच्या मैत्रीच्या नात्याचं रुपांतर या दिवशी पती पत्नीच्या नात्यात झालं. साजिरी खूप चांगली मैत्रीण असून १३ वर्षे तिने हे नाते चांगल्या पद्धतीनं हाताळते आहे.

दिल दोस्ती दुनियादारी ही अमेयची मालिका तर प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. तसेच मुरांबा, फास्टर फेणे, धुराळा यांसारख्या चित्रपटातील त्याच्या भूमिकेचे देखील कौतुक झाले होते.अमेय अभिनेत्री सई ताम्हणकरसोबत गर्लफ्रेंड सिनेमात दिसला होता. 

Web Title: Ameya wagh's wife is beautiful like a actress