सेक्रेड गेम्समध्ये 'या' मराठमोळ्या अभिनेत्याची एंट्री !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2019 12:25 IST2019-08-13T12:15:26+5:302019-08-13T12:25:10+5:30

सेक्रेड गेम्सचा दुसरा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  या वेबसिरिजची वाट प्रेक्षक मोठ्या आतुरतेने  पाहात आहेत.

Amey wagh took entry in sacred games 2 | सेक्रेड गेम्समध्ये 'या' मराठमोळ्या अभिनेत्याची एंट्री !

सेक्रेड गेम्समध्ये 'या' मराठमोळ्या अभिनेत्याची एंट्री !

सेक्रेड गेम्सचा दुसरा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  या वेबसिरिजची वाट प्रेक्षक मोठ्या आतुरतेने  पाहात आहेत.  या सिझनमध्ये सैफ अली खान, नवाझुद्दीन सिद्दीकी असे काही जुने चेहरे आहेत. पण त्याचसोबत अनेक नवीन कलाकारांची देखील एंट्री झाली आहे. या टीममध्ये आता मराठीतील प्रसिद्ध अभिनेता अमेय वाघची एंट्री झाली आहे. अमेय यात खलनायकाच्या भूमिकेत दिसणार असल्याची माहिती आहे. 


सेक्रेड गेम्स’ चे दिग्दर्शन अनुराग कश्यप आणि विक्रमादित्य मोटवाने यांनी दोघांनी मिळून केले होते. पण दुसऱ्या सिझनमध्ये विक्रमादित्यची जागा नीरज घयवानने घेतली आहे. ‘सेक्रेड गेम्स’ला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद लाभला होता. विक्रम चंद्रा यांच्या 'सेक्रेड गेम्स' या कांदबरीवर आधारित ही वेबसीरिज आहे.

या वेबसीरिजमध्ये नवाजुद्दीन सिद्दिकीने साकारलेली गणेश गायतोंडेची भूमिका रसिकांना खूपच भावली. ‘कभी कभी लगता है अपुनीच भगवान है’ म्हणणाऱ्या गणेश गायतोंडेचे अनेक संवाद सोशल मीडियावर हिट ठरले. शिवीगाळ, खून, मारामारी, अश्लील संवाद आणि दृश्याने भरलेली ही वेबसीरिज जितकी वादाच्या भोवऱ्यात सापडली तितकीच ती लोकप्रियदेखील झाली.


अमेय बाबत बोलायचे झाले तर तो काही दिवसांपूर्वी अमेय वाघचा गर्लफ्रेंड सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्याच्या या सिनेमातील भूमिकेचे कौतुक देखील झाले होते. अमेयने नाटक, मालिका व चित्रपट अशा तिन्ही माध्यमातून आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांची मने जिंकली आहेत. 

Web Title: Amey wagh took entry in sacred games 2