अमेय वाघचा स्वॅग पाहून फॅन्स झाले क्रेझी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2020 06:30 IST2020-02-17T06:30:00+5:302020-02-17T06:30:00+5:30

आपल्या अभिनयाने अमेयने रसिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे.

Amey wagh share his new photo on social media | अमेय वाघचा स्वॅग पाहून फॅन्स झाले क्रेझी

अमेय वाघचा स्वॅग पाहून फॅन्स झाले क्रेझी

मराठी सिनेमा, छोटा पडदा, रंगभूमी, वेबसिरीज अशा विविध माध्यमातून आपल्या अभिनयाची छाप पाडणारा अभिनेता म्हणजे अमेय वाघ. आपल्या अभिनयाने अमेयने रसिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. दिल दोस्ती दुनियादारी ही त्याची मालिका तर प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. तसेच मुरांबा, फास्टर फेणे यांसारख्या चित्रपटातील त्याच्या भूमिकेचे देखील कौतुक झाले होते. काही महिन्यांपूर्वी अमेय अभिनेत्री सई ताम्हणकरसोबत गर्लफ्रेंड सिनेमात दिसला होता. 


ते सोशल मीडियावर चाहत्यांशी संवाद साधत असतो.  फोटो, व्हिडीओ आणि आपल्या आगामी सिनेमाची माहिती तो सोशल मीडियाच्या माध्यमातून फॅन्सना तो देत असतो. अमेयने एका फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यात तो स्वॅग अंदाजात दिसतोय. या फोटोत सूर्य अमेयच्या बरोबर डोक्यावर आला आहे. अमेयच्या या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा  वर्षाव केला आहे. 


अमेय वाघचा 'धुरळा' सिनेमा काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. अमेयला यावर्षीचा लोकमत प्रादेशिक चित्रपट (डिजिटल) विभागात सर्वोत्कृष्ट स्टायलिश अभिनेत्याचा किताब मिळाला. हा किताब स्वीकारताना अमेयने मराठी प्रेक्षकांना त्यांचे श्रेय दिले. 'माझं मराठी भाषेवर आणि माझ्या कलेवर प्रेम आहे, माझं मराठी असणं मला जास्त स्टायलिश वाटतं, त्यामुळे हे अवॉर्ड मी माझ्या सर्व मराठी प्रेक्षकांना डेडिकेट करतो' असे भावोद्गार त्याने काढले होते.

Web Title: Amey wagh share his new photo on social media