रसिकाच्या हॉट फोटोंवर अमेय वाघची मजेशीर प्रतिक्रिया, त्याने म्हटले की.......

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2020 16:22 IST2020-01-31T16:22:31+5:302020-01-31T16:22:49+5:30

रसिका सुनीलने छोट्या पडद्यावरील 'माझ्या नव-याची बायको' मालिकेत शनाया ही भूमिका साकारली होती.शनाया भूमिकेमुळे तिला खूप लोकप्रियता मिळाली होती.

Amey Wagh Reaction On Rasika Sunil Sexy Photo | रसिकाच्या हॉट फोटोंवर अमेय वाघची मजेशीर प्रतिक्रिया, त्याने म्हटले की.......

रसिकाच्या हॉट फोटोंवर अमेय वाघची मजेशीर प्रतिक्रिया, त्याने म्हटले की.......

रसिका सुनिल सोशल मीडियावर बरीच अॅक्टिव्ह असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती स्वतःचे हॉट आणि सेक्सी फोटो आपल्या फॅन्ससह शेअर करत असते. तिच्या या फोटोंमधील मादक अदा कुणालाही अक्षरक्षः वेड लावतील अशाच असतात. छोटा पडदा गाजवल्यानंतर तिने  रुपेरी पडद्यावरही दमदार एंट्री केली. त्यानंतर तिचे रूपेरी पडद्यावर फारसं दर्शन झालं नसलं तरी आपल्या या हॉट फोटोंच्या माध्यमातून तिने रसिकांच्या काळजाचा ठाव घेतलाय. याच फोटोंच्या यादीत रसिकाच्या आणखी एका नव्या फोटोंची भर पडली आहे. 

नव्या फोटोशूटमधील रसिका करफुल बिकनीमध्ये असून सेक्सी पोझ दिलेला रसिकाचा हा फोटो भलताच हॉट आहे. तिचा हा फोटो पाहून तुम्हीसुद्धा म्हणाल की पाहताच ती बाला, कलेजा खल्लास झाला. हे फोटो पाहून अमेय वाघ सुद्धा स्वतःला रोखू शकला नाही. या फोटोंवर मजेशीर कमेंट करत त्याने म्हटले की, 'आमचा कास्टींग काऊच मधला काऊच कशाला चोरला'. अमेय वाघची कमेंटस पाहून इतरही युजरही त्याला रिप्लाय करत या गोष्टीची मजा घेत आहेत. 
 

रसिका सुनीलने छोट्या पडद्यावरील 'माझ्या नव-याची बायको' मालिकेत शनाया ही भूमिका साकारली होती.शनाया भूमिकेमुळे तिला खूप लोकप्रियता मिळाली होती.मालिकेत तिची निगेटीव्ह भूमिका असली तरी आपल्या खास अंदाजात तिने ही भूमिका साकारली होती. तिच्या भूमिेकला रसिकांचीही भरघोस पसंती मिळाली होती.तिचा मालिकेतील अल्लडपणा रसिकांना चांगलाच भावला होता. मात्र पुढील शिक्षणासाठी शनाया अर्थात रसिकाने ही मालिका सोडली आणि ती अमेरिकेत गेली.अमेरिकेत रसिका शिक्षणासोबत विविध गोष्टी करताना पहायला मिळते. ती सोशल मीडियावरून आपल्या चाहत्यांना तिथले अपडेट्स देत असते.
 

Web Title: Amey Wagh Reaction On Rasika Sunil Sexy Photo