रिंकू राजगुरूसोबत हे कलाकार लंडनमधून झाले 'छूमंतर', परतले मायदेशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2020 08:00 IST2020-11-03T08:00:00+5:302020-11-03T08:00:00+5:30

रिंकू काही दिवसांपूर्वी लंडनमध्ये छूमंतर चित्रपटाचे शूटिंग करत होती. मात्र आता लंडनमधील शूटिंग पूर्ण करून ती भारतात परतली आहे.

Along with Rinku Rajguru, the artist came from London to 'Chhumantar' and returned home | रिंकू राजगुरूसोबत हे कलाकार लंडनमधून झाले 'छूमंतर', परतले मायदेशी

रिंकू राजगुरूसोबत हे कलाकार लंडनमधून झाले 'छूमंतर', परतले मायदेशी

'सैराट' सिनेमानंतर रिंकू राजगुरु हिने रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं. इतकंच नाही तर 'सैराट' या सिनेमासाठी तिला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. एका रात्रीत रिंकू महाराष्ट्रात लोकप्रिय झाली. सैराटच्या यशानंतर रिंकूने कधीच मागे वळून पाहिलं नाही. या चित्रपटानंतर रिंकू राजगुरूचा फॅन फॉलोव्हिंगदेखील चांगलाच वाढला. रिंकू सोशल मीडियावर सक्रीय असून ती तिथून चाहत्यांशी संवाद साधत असते. रिंकू काही दिवसांपूर्वी लंडनमध्ये छूमंतर चित्रपटाचे शूटिंग करत होती. मात्र आता लंडनमधील शूटिंग पूर्ण करून ती भारतात परतली आहे. इतकेच नाही तर प्रार्थना बेहरे, सुव्रत जोशी, ऋषी सक्सेना आणि श्रीनिवास पोकळे हेदेखील मायदेशी परतले आहेत. 


रिंकू राजगुरू हिने इंस्टाग्रामवर लंडनमधील फोटो शेअर करत लिहिले की, बाय बाय लंडन, बॅक टू इंडिया. 


तसेच या चित्रपटातील इतर कलाकारांनीही सोशल मीडियावर लंडनवरून भारतात परतल्याचे पोस्टच्या माध्यमातून सांगितले. 

छूमंतर चित्रपटात प्रार्थना बेहरेसोबत अभिनेत्री रिंकू राजगुरू, अभिनेता सुव्रत जोशी आणि ऋषी सक्सेना मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

या चित्रपटाचे दिग्दर्शन समीर जोशी करत आहेत.

प्रार्थना बेहरे, रिंकू राजगुरू, सुव्रत जोशी आणि ऋषी सक्सेना यांना एकत्र रुपेरी पडद्यावर काम करताना पाहणे कमालीचे ठरणार आहे.

Web Title: Along with Rinku Rajguru, the artist came from London to 'Chhumantar' and returned home