लेक सासरी जात असताना भावुक झाल्या अलका कुबल, त्या क्षणाचा फोटो केला शेअर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2022 16:07 IST2022-02-09T16:06:40+5:302022-02-09T16:07:05+5:30

अभिनेत्री अलका कुबल-आठल्ये (Alka Kubal-Athalye) आणि समीर आठल्ये (Sameer Athalya) यांची थोरली मुलगी ईशानी नुकतीच लग्नाच्या बंधनात अडकली आहे.

Alka Kubal got emotional while going to Lake Sasari, shared a photo of that moment | लेक सासरी जात असताना भावुक झाल्या अलका कुबल, त्या क्षणाचा फोटो केला शेअर

लेक सासरी जात असताना भावुक झाल्या अलका कुबल, त्या क्षणाचा फोटो केला शेअर

मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री अलका कुबल (Alka Kubal) यांनी रुपेरी पडद्यावर सून, लेक अशा व्यक्तिरेखा साकारून प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. अभिनेत्री अलका कुबल-आठल्ये आणि समीर आठल्ये यांची थोरली मुलगी ईशानी नुकतीच लग्नाच्या बंधनात अडकली आहे. तिच्या लग्नातील सुंदर फोटो सोशल मीडियावर त्यांनी शेअर केले होते. तसेच नुकताच अलका कुबल यांनी एक फोटो शेअर केल्या आहेत. त्यात त्या भावुक झालेल्या दिसत आहेत. 

अलका कुबल यांनी इंस्टाग्रावर एक फोटो शेअर केला आहे. त्यात त्यांच्या आजूबाजूला काही लोक दिसत आहेत. त्यांनी हा फोटो शेअर करून लिहिले की, इमोशनल मोमेंट.. जेव्हा लेक चालली सासरला. त्याच्या या पोस्टला चाहत्यांची खूप पसंती मिळते आहे. इतकेच नाही तर या पोस्टवर कमेंट्सचा वर्षावदेखील होताना दिसत आहे. सोनाली कुलकर्णी हिने या पोस्टवर कमेंट केली की, खूप गोड फोटो. बऱ्याच जणांनी हार्ट इमोजी शेअर केली आहे.

अलका कुबल-आठल्ये आणि समीर आठल्ये यांना या दोन मुली आहेत ज्यांचे नाव ईशानी आणि कस्तुरी आहे. काही दिवसांपूर्वी त्यांची . मोठी लेक ईशानीने दिल्लीतील निशांत वालिया याच्यासोबत लग्न केले. ईशानी आणि निशांतच्या विवाह सोहळ्याला मोजकेच लोक उपस्थित होते. 


ईशानी वैमानिक असून तिला लहानपणापासूनच काहीतरी वेगळे करायचे होते. त्यामुळे तिने अभिनयाचे क्षेत्रात न येता वैमानिक बनायचा निश्चय केला. ईशानीने वैमानिक बनण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. तिला व्यावसायिक विमान चालवण्यासाठी लायसन्स देखील मिळाले आहे.

Web Title: Alka Kubal got emotional while going to Lake Sasari, shared a photo of that moment