आलिया भट्टने दिले अमृता खानविलकरला खास गिफ्ट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2017 13:59 IST2017-11-04T07:54:17+5:302017-11-04T13:59:00+5:30

मराठीतली ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी अमृता खानविलकर सध्या बॉलिवूडच्या अनेक चित्रपटातून ती पदार्पण करत आहे.नुकतेच अमृताचे ट्विटर वर ...

Alia Bhatt gave special gift to Amrita Khanvilkar | आलिया भट्टने दिले अमृता खानविलकरला खास गिफ्ट!

आलिया भट्टने दिले अमृता खानविलकरला खास गिफ्ट!

ाठीतली ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी अमृता खानविलकर सध्या बॉलिवूडच्या अनेक चित्रपटातून ती पदार्पण करत आहे.नुकतेच अमृताचे ट्विटर वर 100k फॉलोवर झाले म्हणून तिने तिच्या चाहत्यांचे आभार मानले. सध्या अमृता खानविलकर मेघना गुलजार दिग्दर्शित आगामी 'राझी' या चित्रपटामध्ये आलिया भट्ट सोबत काम करत आहे. चित्रपटाची शूटिंग नुकतीच झाली असून हा चित्रपट तिच्यासाठी एक नाही तर अनेक कारणांमुळे खूप खास आहे.असे अमृताने तिच्या अनेक मुलाखतीत सांगितले आहे. मात्र की कारण आत्ताच सांगणार नाही त्यासाठी थोडी वाट पाहावी लागणार असल्याचेही तिने आवर्जुन सांगितले.विशेष म्हणजे चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान आलिया आणि अमृताची मैत्री अक वाढली हे देखील अमृताने आपल्या मुलाखतीत सतत म्हटले आहे. आणि ह्याचा ठोस पुरावा म्हणजे आलियाने अमृताला पाठवलेली एक भेटधिवस्तू!  ज्यात आलियाने स्वहस्ताक्षरात एक छोटेसे आभारपत्र आणि काही सुंदर भेटवस्तू अमृताला पाठवल्या. अमृता हे पाहून अगदी भारावून गेली,अमृताने सोशल मीडियावर ह्या बाबत पोस्ट केले आहे. ज्यात ती म्हणतेय, "आलिया कडून मिळालेली भेट अविस्मरणीय आहे,तसेच तिच्याकडून बरच काही शिकण्यासारखं आहे. तिच्यात असलेले विशेष कौशल्य अगदी कौतुकास्पद आहे.'राझी' हा माझ्यासाठी खूप छान आणि वेगळा अनुभव आहे परंतु तुझी भेटवस्तू अविस्मरणीय आहे और ये करके आपने उसपे मोहर लगा दी ....अशा शब्दांत तिने आलियाचे आभार मानले आहेत.




अमृता खानविलकरने आज मराठी चित्रपटसृष्टीत तिचे खास स्थान निर्माण केले आहे. नटरंग या चित्रपटातील वाजले की बारा या लावणीवर तिने सादर केलेल्या नृत्यावर आजही अनेकजण फिदा आहेत. तिने सतरंगी रे, बाजी यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. मराठी चित्रपटांप्रमाणेच तिने फूंक 2 यांसारख्या काही हिंदी चित्रपटांमध्ये देखील खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. 24च्या दुसऱ्या सिझनमध्ये देखील ती महत्त्वाच्या भूमिकेत झळकली होती. 'नच बलिये' या कार्यक्रमातदेखील तिने पती हिमांशू मल्होत्रासोबत भाग घेतला होता. या कार्यक्रमात या दोघांनी एकाहून एक सरस नृत्य सादर केले आणि त्यांनी या कार्यक्रमाचे विजेतेपद मिळवले.अमृताचे आज असंख्य चाहते आहेत. अमृताच्या काही चाहत्यांनी तिच्या प्रवासाचा एक छानसा व्हिडिओ तिच्या इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर पोस्ट केला आहे.अमृताच्या चाहत्यांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओत अमृताच्या बालपणीपासून ते आतापर्यंतचे अनेक फोटो आपल्याला पाहायला मिळत आहेत. तिने आजवर मिळवलेले यश या व्हिडिओद्वारे लोकांपर्यंत पोहोचवण्याचा अमृताच्या फॅन्सने प्रयत्न केला आहे. 

Web Title: Alia Bhatt gave special gift to Amrita Khanvilkar