लॉकडाऊन दरम्यान पाठकबाई झाल्या हॉट अँड बोल्ड, सोशल मीडियावर शेअर केला हा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2020 13:39 IST2020-04-06T13:22:21+5:302020-04-06T13:39:21+5:30
अभिनेत्री अक्षया देवधर हिची 'तुझ्यात जीव रंगला' ही पहिलीच मालिका असून पाठक बाई म्हणून तिने या मालिकेतून लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे.

लॉकडाऊन दरम्यान पाठकबाई झाल्या हॉट अँड बोल्ड, सोशल मीडियावर शेअर केला हा फोटो
अभिनेत्री अक्षया देवधर हिची 'तुझ्यात जीव रंगला' ही पहिलीच मालिका असून पाठक बाई म्हणून तिने या मालिकेतून लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे. मालिकेत अक्षया रसिकांना नेहमीच सोज्वळ रुपात दिसत असते. त्यामुळे अल्पावधीतच तिने रसिकांची मनं जिंकली आहेत.
कोरोना व्हायरसच्या थैमानामुळे देशात 21 दिवसांचं लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे सगळेच कामकाज ठप्प पडले आहे. कलाकार मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या फॅन्ससोबत संपर्कात आहेत. अभिनेत्री अक्षय देवधर ही अक्षया सोशल मीडियावरही बरीच एक्टिव्ह असते. आपले फोटो आणि व्हिडिओ ती आपल्या फॅन्ससह शेअर करत असते. या माध्यमातून ती आपल्या फॅन्सशी संवाद साधत असते. तिने इन्स्टाग्रामवर तिचा एक काळ्या रंगाच्या टॉपमधला हॉट फोटो शेअर केला आहे. यावर फॅन्सनी लाईक्सचा वर्षाव केला आहे.
अशा प्रकारे फोटो शेअर करण्याची अक्षयाची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही तिने तिचे ग्लॅमरस लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.