'पानीपत'नंतर अजय-अतुलच्या हाती लागला ऋतिक रोशनचा चित्रपट
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2018 13:13 IST2018-05-11T07:43:02+5:302018-05-11T13:13:27+5:30
आशुतोष गोवारीकर यांच्या पानीपतचे संगीत अजय-अतुल देतायेत हे आम्ही तुम्हाला गुरुवारीच सांगितले होते. त्यानंतर आणखीन एक बॉलिवूडचा चित्रपट यांच्या ...

'पानीपत'नंतर अजय-अतुलच्या हाती लागला ऋतिक रोशनचा चित्रपट
आ ुतोष गोवारीकर यांच्या पानीपतचे संगीत अजय-अतुल देतायेत हे आम्ही तुम्हाला गुरुवारीच सांगितले होते. त्यानंतर आणखीन एक बॉलिवूडचा चित्रपट यांच्या हाती लागण्याला आहे. होय, तुम्ही बरोबर वाचलात एक बिग बजेट चित्रपट या संगीतकार जोडीला मिळण्याला आहे. अजय- अतुल यांनी नुकतीच आनंद कुमार यांची भेट घेतली. 'सुपर 30' साठी त्यांनी आनंद कुमार यांना आपले संगीत ऐकवून मंत्रमुग्ध केले. 'सुपर 30' चित्रपटात एकापेक्षा एक सुंदर गाणी असतील असा विश्वास अजय-अतुलच्या जोडीने आनंद कुमार यांना दिला आहे.
आनंद यांनी आयएएनएसशी बोलताना सांगितले की, मला काही गाण्याच्या चाली ऐकवल्या गेल्या ज्या ऐकून मी मंत्रमुग्ध झालो. मला पूर्ण विश्वास आहे ज्यावेळी तुम्ही चित्रपट बघाल त्यावेळी तुम्हाला ही चित्रपटातील संगीत उत्साहित करेल.
सुपर 30 या चित्रपटात ऋतिक रोशन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ऋतिकचे फॅन्स या चित्रपटाची वाट मोठ्या आतुरतेने बघातायेत. हा चित्रपट पाटणाच्या आनंद कुमार याच्या जीवनावर आधारित आहे. ज्यांनी १९९२मध्ये गणित हा विषय शिकवायला सुरवात केली होती त्यावेळेस त्यांनी सुरुवातीला महिना ५०० रुपये देऊन भाड्याच्या खोलीत शिकवायला सुरवात केली होती पण नंतरच्या २ वर्षातच त्याच्याकडे २ विद्यार्थ्यांपासून ३६ विद्यार्थी झाले आणि नंतर त्याच्याकडील विद्यार्थ्यांची संख्या ५०० वर गेली नंतर या गोष्टी रून प्रेरित होऊन त्यांनी 'सुपर३०' ची सुरवात केली. आनंद कुमार बिहारात सुपर ३०' नावाचा एक प्रोग्राम चालवतात. या प्रोग्रामअंतर्गत आनंद कुमार यांनी आत्तापर्यंत अनेक गरिब व होतकरू मुलांना नि:शुल्क शिकवून त्यांना आयआयटीमध्ये प्रवेश मिळवून दिला आहे. जे विद्यार्थी अतिशय हुशार आहेत परंतु आर्थिक अडचणींमुळे आयआयटीच्या परीक्षा देऊ शकत नाहीत, अशा विद्यार्थ्यांना आनंद कुमार संधी देतात. आनंद कुमार यांच्या या कार्यात त्यांचा भाऊ प्रणव कुमार देखील त्यांना मदत करतात. पुढच्या वर्षी 25 जानेवरीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.