"तो सच्चा दिलाचा माणूस...", अजिंक्य देव यांच्या फिटनेसवर फिदा होता रणबीर कपूर, म्हणाले- "शूटिंग झाल्यावर तो..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 11:57 IST2025-11-19T11:57:24+5:302025-11-19T11:57:59+5:30
नितेश तिवारींच्या आगामी 'रामायण' सिनेमात अजिंक्य देव रणबीर कपूरसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अजिंक्य देव यांनी रणबीरसोबत काम करण्याचा अनुभव सांगितला.

"तो सच्चा दिलाचा माणूस...", अजिंक्य देव यांच्या फिटनेसवर फिदा होता रणबीर कपूर, म्हणाले- "शूटिंग झाल्यावर तो..."
अजिंक्य देव हे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते. मराठीसोबत त्यांनी हिंदी सिनेसृष्टीही गाजवली. अजिंक्य देव सध्या त्यांच्या '१२० बहादूर' सिनेमामुळे चर्चेत आहेत. नितेश तिवारींच्या आगामी 'रामायण' सिनेमातही ते दिसणार आहेत. या सिनेमात अजिंक्य देव रणबीर कपूरसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अजिंक्य देव यांनी रणबीरसोबत काम करण्याचा अनुभव सांगितला.
अजिंक्य देव यांनी वरिंदर चावलला दिलेल्या मुलाखतीत रणबीरचं कौतुक केलं. ते म्हणाले, "रणबीरने मला खूप कंमर्फेटेबल फील करवून दिलं. सीन झाल्यावर तो "काय छान शॉट दिला सर", असं म्हणत कौतुक करायचा. मला ते आवडायचं. कोणी तुम्हाला प्रोत्साहन देत असेल तर तुम्हालाही ते आवडतं. तो मला म्हणायचा की सर तुम्ही वाटत नाही. तुम्ही कुठे वर्कआऊट करता? मी त्याला म्हणायचो की बॉस थँक्यू...तुझ्याकडे बघ आणि माझ्याकडे बघ. तो मला म्हणायचा की नाही सर तुमच्या वयाचा होईपर्यंत माझं काय होईल मला माहीत नाही. पण हेच आयुष्य आहे".
"पण, तो खरंच खूप निर्मळ मनाचा(सच्चा दिलाचा) माणूस आहे. कुठलेही फिल्टर तो लावत नाही. तो जसा आहे तसाच आहे. आणि हेच स्क्रीनवरही दिसतं. त्यामुळे प्रेक्षक तुमच्यासोबत डायरेक्ट कनेक्ट होतात. पूर्वी कलाकार आणि प्रेक्षकांमध्ये एक न दिसणारा पडदा असायचा. तेव्हा तशी स्टाइल होती. पण आता कोणतेच फिल्टर ठेवून कलाकार वावरत नाहीत", असंही ते पुढे म्हणाले. रामायण'मध्ये अजिंक्य देव विश्वामित्र ही भूमिका साकारताना दिसणार आहेत. तर रणबीर कपूर प्रभू श्रीरामाच्या भूमिकेत आहे. २०२६ च्या दिवाळीत रामायण सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.