"अतिशय हृदयद्रावक...", अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर हेमंत ढोमेची भावुक पोस्ट, म्हणाला- "या कठीण काळात"

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 10:45 IST2025-06-13T10:43:48+5:302025-06-13T10:45:01+5:30

अहमदाबाद विमान अपघातानंतर हेमंत ढोमे हळहळला, पोस्ट शेअर करत म्हणाला- "या कठीण काळात"

ahmedabad plane crash marathi cinema actor hemant dhome share emotional post  | "अतिशय हृदयद्रावक...", अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर हेमंत ढोमेची भावुक पोस्ट, म्हणाला- "या कठीण काळात"

"अतिशय हृदयद्रावक...", अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर हेमंत ढोमेची भावुक पोस्ट, म्हणाला- "या कठीण काळात"

Ahmedabad Plane Crash :गुजरातमधीलअहमदाबाद (Ahmedabad Plane Crash) येथून लंडनला जाण्यासाठी अवकाशात झेपावलेले  एअर इंडियाचे बोईंग  ७८७  ड्रीमलायनर विमान गुरुवारी दुपारी उड्डाण केल्यानंतर क्षणार्धात कोसळले व आग लागून भस्मसात झाले. या अपघातात विमानातील २४५ प्रवाशांचा मृत्यू झाला असून अन्य २५ जण जखमी असल्याची माहिती मिळते आहे. काल  घडलेल्या या अपघातामुळे अनेक कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे संपूर्ण देश हळहळला आहे. दरम्यान, सर्व स्तरांतून शोक व्यक्त केला जात आहे. या दूर्घटनेवर मराठी अभिनेता, दिग्दर्शक हेमंत ढोमेने (Hemant Dhome) सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दु ख व्यक्त केलं आहे. 

अहमदाबाह येथे घडलेल्या या घटनेमुळे अनेकांनी प्रवाशांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. दरम्यान, या घटनेचा शोक व्यक्त करत हेमंत ढोमेने एक्सवर पोस्ट शेअर करत लिहिलंय की, "अहमदाबादमधील विमान अपघाताची बातमी अतिशय हृदयद्रावक आहे. या दुर्घटनेत ज्या लोकांनी आपले प्राण गमावले, त्यांच्या आत्म्याला शांती लाभो हीच प्रार्थना. त्यांचे कुटुंबीय, या अपघातातील जखमी आणि सर्व प्रभावित लोक यांच्याबद्दल मनापासून सहवेदना! या कठीण काळात माझ्या प्रार्थना त्या सर्वांसोबत आहेत." अशा भावना अभिनेत्याने व्यक्त केल्या आहेत. 

अहमदाबाद येथील या दुर्दैवी अपघातानंतर आता विमानतळावरील सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. अपघातस्थळी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करण्यात आलं. हे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले असून या इमारतींचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. 

Web Title: ahmedabad plane crash marathi cinema actor hemant dhome share emotional post 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.