अगडबम नाजुकाचे 'अटकमटक' गाणे प्रदर्शित, सोशल मीडियावर हिट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2018 12:47 IST2018-09-14T12:45:46+5:302018-09-14T12:47:00+5:30

'माझा अगडबम'च्या या पोस्टरवर तृप्तीने साकारलेली अगडबम नाजूका आणि तिचा पती रायबाच्या भूमिकेतला सुबोध भावे आपल्याला पाहायला मिळतो आहे.

Agadbam Marathi Movie Atak Matak Song Hit On Social Media | अगडबम नाजुकाचे 'अटकमटक' गाणे प्रदर्शित, सोशल मीडियावर हिट

अगडबम नाजुकाचे 'अटकमटक' गाणे प्रदर्शित, सोशल मीडियावर हिट

'अटकमटक'चा डाव प्रत्येकांनी आपल्या लहानपणी खेळला असेल ! धम्माल मस्ती आणि पोटभर हसू आणणाऱ्या या बैठी खेळाचे बोल, आता नव्या रुपात आपल्यासमोर येणार आहे. 'पेन इंडिया लिमिटेड कंपनी'चे जयंतीलाल गडा आणि तृप्ती भोईर फिल्म्स प्रस्तुत 'माझा अगडबम' या चित्रपटातील 'अटकमटक' हे गाणे प्रेक्षकांचे तुफान मनोरंजन करणारे आहे. सोशल नेट्वर्किंग साईटवर नुकतेच प्रदर्शित करण्यात आलेले हे विनोदी गाणे, 'माझा अगडबम' सिनेमातील 'नाजूका' या प्रमुख पात्रावर आधारित आहे. 

रसिकांना ठेका धरायला भाग पडणाऱ्या या धम्माल गाण्याला आनंद शिंदे यांचा दमदार आवाज लाभला आहे. मंदार चोळकर यांनी शब्दबद्ध केलेल्या या 'अटकमटक' गाण्याला, टी. सतीश चक्रवर्ती यांनी संगीत दिले आहे. नाजुकाच्या विविध करामती दाखवणारे हे गाणे पाहणाऱ्यांना मनोरंजनाची नवी 'चटक' लावून जाते. येत्या २६ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत असलेल्या या सिनेमात तृप्ती भोईर आणि सुबोध भावे यांची प्रमुख भूमिका आहे. 

शिवाय, सुपरहिट 'अगडबम'चा दमदार सिक्वेल असलेल्या या 'माझा अगडबम'चे दिग्दर्शन आणि लेखन तृप्ती भोईरनेच केले असून, टी. सतीश चक्रवर्ती, धवल जयंतीलाल गडा आणि अक्षय जयंतीलाल गडा यांसोबत तिने निर्मितीफळीतदेखील आपला सहभाग दर्शवला आहे. शिवाय, रेश्मा कडाकिया, कुशल कांतीलाल गडा आणि नीरज गाला यांनी या सिनेमाच्या सहनिर्मात्याची धुरा सांभाळली आहे.

या सिनेमाच्या पोस्टरमुळे, 'माझा अगडबम' हा सिनेमा पूर्वीपेक्षा अधिक डबल धमाका करणार असल्याचे दिसून येत आहे. लेखिका, दिग्दर्शिका, निर्माती आणि अभिनेत्री अशा चारसूत्री भूमिकेतून लोकांसमोर येणाऱ्या तृप्ती भोईरच्या या सिनेमाचे नुकतेच सोशल नेट्वर्किंग साईटवर पोस्टर लाँच करण्यात आले.

'माझा अगडबम'च्या या पोस्टरवर तृप्तीने साकारलेली अगडबम नाजूका आणि तिचा पती रायबाच्या भूमिकेतला सुबोध भावे आपल्याला पाहायला मिळतो. पण या दोघांबरोबरच आणखीन एक अगडबम व्यक्ती यात आपल्याला दिसून येत आहे. अशा या दोन अगडबम व्यक्तींच्यामध्ये अडकलेला सुबोध भावे या सिनेमाच्या पोस्टरमध्ये आपल्याला पाहायला मिळतो.  
 

Web Title: Agadbam Marathi Movie Atak Matak Song Hit On Social Media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.