शिवानी रांगोळे-विराजस कुलकर्णीनंतर हा मराठमोळा अभिनेता अडकला लग्नबेडीत, रजिस्टर पद्धतीनं केलं लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2022 12:36 IST2022-05-11T12:35:16+5:302022-05-11T12:36:01+5:30

मराठी सिनेइंडस्ट्रीत गेल्या काही दिवसांपासून लग्नाची धामधूम पाहायला मिळत आहे. आता आणखी एक अभिनेता विवाहबंधनात अडकला आहे.

After Shivani Rangole-Virajas Kulkarni, this Marathi actor got stuck in marriage, got married by registered method | शिवानी रांगोळे-विराजस कुलकर्णीनंतर हा मराठमोळा अभिनेता अडकला लग्नबेडीत, रजिस्टर पद्धतीनं केलं लग्न

शिवानी रांगोळे-विराजस कुलकर्णीनंतर हा मराठमोळा अभिनेता अडकला लग्नबेडीत, रजिस्टर पद्धतीनं केलं लग्न

मराठी सिनेइंडस्ट्रीत गेल्या काही दिवसांपासून लग्नाची धामधूम पाहायला मिळत आहे. नुकतेच विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे यांचा लग्नसोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. तसेच अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी यांचा साखरपुडा पार पडला. तर अप्सरा फेम सोनाली कुलकर्णी नवरा कुणाल बेनोडेकरसोबत लंडनमध्ये पुन्हा लग्नगाठ बांधली. त्यानंतर आता समजते आहे की, मराठी चित्रपटसृष्टीतील आणखी एक अभिनेता विवाहबंधनात अडकला आहे. हा अभिनेता म्हणजे लकी फेम अभय महाजन.

लकी फेम अभिनेता अभय महाजनने नुकतेच कोरिओग्राफर असलेल्या दिया नायडू सोबत लग्नगाठ बांधली आहे. काही दिवसांपूर्वीच अभयचे केळवण साजरे करण्यात आले होते. पर्ण पेठे, अलोक राजवाडे, अक्षय टंकसाळे या त्याच्या खास मित्रांनी अभयचे केळवण केले होते. त्यानंतर अभय लवकरच लग्न करणार हे स्पष्ट झाले होते.


अभय आणि दियाचा मेहेंदी सोहळा थाटात पार पडला आहे. यावेळी अभयने आपल्या हातावर मेहेंदीने दिवा काढून दियाच्या नावाने हटके अंदाजात मेहेंदी काढली होती. त्यानंतर त्यांची हळद आणि संगीत सोहळा रंगलेला पाहायला मिळाला. यावेळी मोजक्याच मित्रमंडळींना त्यांनी लग्नाचे आमंत्रण दिले होते. कुबुल है असे हटके अंदाजात म्हणत आणि केक कापून अभयने लग्नाच्या आणाभाका घेतल्याचे पाहायला मिळाले.

तर दिया आणि अभयने रजिस्टर पद्धतीनेही लग्न केले आहे. प्रिया बापट, पर्ण पेठे, अलोक राजवाडे यासारख्या सेलिब्रिटींनी तसेच चाहत्यांनी दिया आणि अभयला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

Web Title: After Shivani Rangole-Virajas Kulkarni, this Marathi actor got stuck in marriage, got married by registered method