​सलमान खाननंतर अमिताभ बच्चन यांनी केले एफयूसाठी ट्वीट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2017 14:44 IST2017-04-25T09:14:45+5:302017-04-25T14:44:45+5:30

मराठी चित्रपटाला सध्या चांगले दिवस आले आहेत असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. बॉलिवूडमधील अनेक कलाकार आज मराठी चित्रपटांच्या ...

After Salman Khan, Amitabh Bachchan has tweeted for the FU | ​सलमान खाननंतर अमिताभ बच्चन यांनी केले एफयूसाठी ट्वीट

​सलमान खाननंतर अमिताभ बच्चन यांनी केले एफयूसाठी ट्वीट

ाठी चित्रपटाला सध्या चांगले दिवस आले आहेत असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. बॉलिवूडमधील अनेक कलाकार आज मराठी चित्रपटांच्या प्रेमात पडले आहेत. अनेक कलाकार आज मराठी चित्रपटांची निर्मिती करत आहेत. अजय देवगण, ट्विंकल खन्ना, प्रियांका चोप्रा यांसारखे कलाकार मराठी चित्रपटांची निर्मिती करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. जॉन अब्राहमदेखील मराठी चित्रपटांच्या निर्मितीत उतरला आहे. तो आता सविता दामोदर परांजपे या मराठी चित्रपटाची निर्मिती करणार आहे. हे सगळे पाहाता बॉलिवूडची मंडळी मराठी चित्रपटांच्या प्रेमात पडली आहेत असेच म्हणावे लागेल.
एफयू म्हणजेच म्हणजेच Friendship Unlimited या चित्रपटाचे पहिले पोस्टर सलमान खानने ट्विटरच्या माध्यमातून नुकतेच लाँच केले होते. सलमान आणि महेश मांजरेकर यांच्या मैत्रीची सगळ्यांनाच कल्पना आहे. सलमानने मैत्रीखातर हे पोस्टर लाँच केल्याचे म्हटले जात होते. पण आता या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी बॉलिवूडमधील आणखी एक कलाकार सरसावला आहे. बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन यांनी एफयू म्हणजेच म्हणजेच Friendship Unlimited या चित्रपटासाठी नुकतेच एक ट्वीट केले आहे. या चित्रपटाचे टीझर लोकांनी पाहावे यासाठी त्यांनी लोकांना आवाहन केले आहे. त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, एफयू या मराठी चित्रपटात आकाश ठोसरची प्रमुख भूमिका असून सत्या मांजरेकर प्रेक्षकांना पाहायला यात मिळणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर करत असून या चित्रपटाचा टीझर जरूर पाहावा.
अमिताभ बच्चन आणि सलमान खान यांना ट्विटर या सोशल नेटवर्किंग साइटवर अनेकजण फॉलो करतात. त्यामुळे अल्पावधितच एफयू म्हणजेच म्हणजेच Friendship Unlimited या चित्रपटाविषयी अधिकाधिक लोकांना कळले आहे. 


 

Web Title: After Salman Khan, Amitabh Bachchan has tweeted for the FU

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.