सलमानच्या सुटकेनंतर रेणुका शहाणेची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2016 13:00 IST2016-07-26T07:29:17+5:302016-07-26T13:00:16+5:30

हम आपके हैं कौन चित्रपटात सलमान खानच्या वहिनीची भूमिका साकारणाºया रील लाईफ भाभी रेणुका शहाणेने काळवीट शिकार प्रकरणात सलमानची ...

After the release of Salman, Renuka Shahane's response | सलमानच्या सुटकेनंतर रेणुका शहाणेची प्रतिक्रिया

सलमानच्या सुटकेनंतर रेणुका शहाणेची प्रतिक्रिया

आपके हैं कौन चित्रपटात सलमान खानच्या वहिनीची भूमिका साकारणाºया रील लाईफ भाभी रेणुका शहाणेने काळवीट शिकार प्रकरणात सलमानची निर्दोष सुटका झाल्याने प्रश्न उपस्थित केले आहेत. या अभिनेत्रिनी फेसबुकवर  पोस्ट केली आहे की, सलमानची निर्दोष सुटका होण्यासोबतच या प्रकरणाचा निकाल उशिरा लागल्याने नाराजी व्यक्त केली आहे. याचसोबत तसंच इतर कलाकारांना या निर्णयातून का वगळलं आहे. संबंधित घटनेवेळी जोधपूरमध्ये सलमानसह, सैफ अली खान, तब्बू, सोनाली बेंद्र आणि नीलम हम साथ साथ है चित्रपटाची शूटिंग करत होते. परंतु त्यापैकी केवळ सलमानवरच काळवीटच्या शिकारीचा आरोप लागला. सलमान जोधपूर जेलमध्येही गेला. पण इतरांविरोधात कोणताही आरोप लावण्यात आला नाही, असं रेणुकाने फेसबुक पोस्ट म्हटले आहे. काळवीटची शिकार कोणी केली? ड्रायव्हरने काळवीटला मारलं? कोणीच काळवीटला मारलं नाही?, असे अनेक प्रश्न रेणुका शहाणेने राजस्थान हायकोर्टाच्या निकालानंतर उपस्थित केले. 

Web Title: After the release of Salman, Renuka Shahane's response

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.