'या' सिनेमातून अनेक वर्षानंतर अवधूत गुप्ते झळकणार ऑनस्क्रीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2018 15:42 IST2018-11-12T15:34:08+5:302018-11-12T15:42:46+5:30

मराठी सिनेसृष्टीत रॉकिंग गाण्यांसाठी ओळखले जाणारे अवधूत गुप्ते, आपल्या चाहत्यांसाठी रॉकिंग गाण्याचं 'गॅटमॅट' घेऊन येत आहे. 'गॅटमॅट होऊ देना' असं बोल असलेल्या या गाण्यामधून, अवधूत बऱ्याच वर्षानंतर ऑनस्क्रीन झळकणार आहे.

After many years of 'this' movie, Avadhoot Gupte will be seen onscreen | 'या' सिनेमातून अनेक वर्षानंतर अवधूत गुप्ते झळकणार ऑनस्क्रीन

'या' सिनेमातून अनेक वर्षानंतर अवधूत गुप्ते झळकणार ऑनस्क्रीन

ठळक मुद्देअवधूत बऱ्याच वर्षानंतर ऑनस्क्रीन झळकणार आहे

मराठी सिनेसृष्टीत रॉकिंग गाण्यांसाठी ओळखले जाणारे अवधूत गुप्ते, आपल्या चाहत्यांसाठी रॉकिंग गाण्याचं 'गॅटमॅट' घेऊन येत आहे. 'गॅटमॅट होऊ देना' असं बोल असलेल्या या गाण्यामधून, अवधूत बऱ्याच वर्षानंतर ऑनस्क्रीन झळकणार आहे. येत्या १६ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होत असलेल्या 'गॅटमॅट' सिनेमातील हे टायटल साँग तरुणवर्गासाठी पर्वणी ठरत आहे. 

सचिन पाठक लिखित ‘गॅटमॅट होऊ देना’ या उडत्या लयीच्या गाण्याला समीर साप्तीस्करने चाल दिली असून,  अवधूतने ते त्याच्या 'स्टाईल'ने पडद्यामागे आणि पडद्यावरही गायलं आहे. कॉलेज विश्वातील सळसळत्या तरुणाईला आकर्षित करणारं हे गाणं साऱ्यांनाच स्फूर्ती देऊन जातं. प्रेमाची गुलाबी छटा एका नव्या ढंगात मांडणारा 'गॅटमॅट' हा सिनेमा प्रेमीजोडप्यांसाठी खास असणार आहे. अवधुत गुप्ते यांची प्रस्तुती आणि यशराज इंडस्ट्रीज यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन निशीथ श्रीवास्तव यांनी केले आहे. तसेच राजेंद्रप्रसाद श्रीवास्तव यांनी या सिनेमाच्या निर्मात्याची धुरा सांभाळली असून तरुणाईने बहरलेल्या या सिनेमात अक्षय टंकसाळे, निखिल वैरागर, रसिका सुनील आणि पूर्णिमा डे हे मराठितील युवा कलाकार आपल्याला पहायला मिळणार आहेत.

अवधुत गुप्ते यांची प्रस्तुती आणि यशराज इंडस्ट्रीज यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन निशीथ श्रीवास्तव यांनी केले आहे. तसेच राजेंद्रप्रसाद श्रीवास्तव यांनी या सिनेमाच्या निर्मात्याची धुरा सांभाळली असून तरुणाईने बहरलेल्या या सिनेमात अक्षय टंकसाळे, निखिल वैरागर, रसिका सुनील आणि पूर्णिमा डे हे मराठीतील युवा कलाकार आपल्याला पहायला मिळणार आहेत.

Web Title: After many years of 'this' movie, Avadhoot Gupte will be seen onscreen