ही अभिनेत्री 40 वर्षानंतर करतेय मराठीत पदार्पण, केले आहे अमिताभ बच्चन यांच्यासोबतदेखील काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2020 07:00 IST2020-03-06T07:00:00+5:302020-03-06T07:00:00+5:30

‘मीडियम स्पाइसी’ या मराठीत सिनेमात दिसणार आहेत.

After 40 years arundhati nag doing come back in marathi movie medium spicy gda | ही अभिनेत्री 40 वर्षानंतर करतेय मराठीत पदार्पण, केले आहे अमिताभ बच्चन यांच्यासोबतदेखील काम

ही अभिनेत्री 40 वर्षानंतर करतेय मराठीत पदार्पण, केले आहे अमिताभ बच्चन यांच्यासोबतदेखील काम

सिने आणि नाट्यविश्वातील ज्येष्ठ अभिनेत्री अरूंधती नाग ‘मीडियम स्पाइसी’ ह्या सिनेमाव्दारे मराठी चित्रपटसृष्टीत परतणार आहेत.पद्मश्री अरूंधती नाग ह्यांनी सुमारे 40 वर्षांपूर्वी ‘22 जून 1897’ ह्या मराठी चित्रपटाव्दारे सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. त्यानंतर आता ‘मीडियम स्पाइसी’ या मराठीत सिनेमात दिसणार आहेत.

अरूंधती नाग ह्यांच्या भूमिकेविषयी सांगताना दिग्दर्शक मोहित टाकळकर म्हणाले, “चित्रपटाचे कथानक आकारत असताना, ‘लक्ष्मी टिपणीस’ह्या भूमिकेसाठी माझ्या डोळ्यांसमोर फक्त अरूंधती नाग ह्यांचीच प्रतिमा उभी राहिली. लक्ष्मी टिपणीस अतिशय प्रगल्भ आणि पुरोगामी स्त्री आहे. पण त्यासोबतच ती जेवढी बुध्दिमान आहे, तेवढीच तिच्यात मायेची उब आहे. सिनेमात जेव्हा लक्ष्मीची एन्ट्री होते, तेव्हा तिला पाहताच तिच्या चैतन्यमयी व्यक्तिमत्वाची जाणीव व्हावी, असं मला वाटलं. म्हणूनच अरूंधती ह्यांना ही भूमिका ऑफर केली.” 

मराठीतल्या आपल्या पुनरागमनाबाबत राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्री अरूंधती नागही खूप उत्सुक आहेत. त्या मराठी सिनेसृष्टीत परण्याविषयी त्या म्हणाल्या, “40 वर्षांनंतर मराठी सिनेसृष्टीत परतणं, ही निश्चितच आल्हाददायक गोष्ट आहे. परतताना एखाद्या नवोदितासारखी अनुभूती होतेय. बंगळुरुला आमच्या रंगशंकरा नाट्यमंदिरात मोहित त्याच्या नाटकांचे प्रयोग करायला येत असतो. अशाच एका प्रयोगावेळी मोहित मला त्याच्यासोबत बसायची विनंती करत म्हणाला, अरू अक्का, मी लवकरच एक चित्रपट दिग्दर्शित करतोय. त्यामध्ये तू एक भूमिका करावीस, अशी माझी इच्छा आहे.”

‘मीडियम स्पाइसी’ नागरी जीवनातल्या प्रेम, नातेसंबंध आणि लग्नसंबंधांवर प्रकाश टाकणारा सिनेमा आहे. ह्या चित्रपटात सई ताम्हणकर, ललित प्रभाकर, पर्ण पेठे, सागर देशमुख, नेहा जोशी, पुष्कराज चिरपुटकर, इप्शिता, ह्या युवाकलाकारांसोबतच नीना कुळकर्णी आणि रवींद्र मंकणी हे ज्येष्ठ कलाकारही महत्वपूर्ण भूमिकांमधून दिसतील. हा सिनेमा 5 जून 2020ला रिलीज होणार आहे.
 

Web Title: After 40 years arundhati nag doing come back in marathi movie medium spicy gda