आता विषय पंपावर! शिंदे कुटुंबीयांचं व्यवसायात पहिलं पाऊल; पंढरपुरात सुरू केला पेट्रोल पंप

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2023 04:29 PM2023-11-12T16:29:38+5:302023-11-12T16:30:06+5:30

शिंदेशाहीचा नादखुळा! व्यवसायात पाऊल टाकत सुरू केलं पेट्रोल पंप, उत्कर्षने शेअर केले फोटो

adarsh shinde utkarsh shinde new business open petrol pump in pandharpur on diwali | आता विषय पंपावर! शिंदे कुटुंबीयांचं व्यवसायात पहिलं पाऊल; पंढरपुरात सुरू केला पेट्रोल पंप

आता विषय पंपावर! शिंदे कुटुंबीयांचं व्यवसायात पहिलं पाऊल; पंढरपुरात सुरू केला पेट्रोल पंप

मराठी कलाविश्वातील शिंदे फॅमिली हे लोकप्रिय कुटुंब आहे. आपल्या सुमधूर आवाजाने ते प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करतात. आनंद शिंदेंची लोकगीते आजही प्रत्येक कार्यक्रमात वाजवली जातात. घरातच गायनाचं बाळकडू मिळाल्याने पुढे आदर्श शिंदेनेही वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत कलाविश्वात नाव कमावलं. वडिलांप्रमाणेच आदर्शही लोकप्रिय गायक आहे. तर त्याचा भाऊ उत्कर्ष शिंदे पेशाने डॉक्टर असून गायकही आहे. चार पिढ्यांपासून संगीताचा वारसा जपणाऱ्या शिंदे कुटुंबाने व्यवसाय क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे. उत्कर्षने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याची माहिती दिली आहे. 

दिवाळीच्या मुहुर्तावर शिंदे कुटुंबीयांनी पंढरपुरात पेट्रोल पंप सुरू केला आहे. "आदर्श आनंद शिंदे" असं या पेट्रोल पंपाचं नाव आहे. काही फोटो शेअर करत उत्कर्षने याबाबत सविस्तर पोस्ट लिहिली आहे. 

उत्कर्ष शिंदेची पोस्ट

“छत्रपती शिवबा ,डॉ बाबासाहेब आंबेडकर ,महात्मा जोतीबा,अण्णा भाऊ,ते अन्य महात्म्यांच्या विचाराना आदर्श मानले म्हणूनच आमचा उत्कर्ष होत आहे”

बाबासाहेब तुम्ही म्हणालात -शिका !आम्ही गायक,डॉक्टर इंजिनिअर झालो .
तुम्ही म्हणालात संघटित व्हा ! !संघर्ष करा...तर आम्ही एक कुटुंब राहून प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत पुढे सरसावलो. रस्त्यावर भजन गाणारी एक पिढी मंदिरात देवाला जागवणारी दुसरी पिढी,लोकसंगीतातून महाराष्ट्राला सण साजरे करताना नाचवणारी तिसरी पिढी ते आज चित्रपटातून सर्वांच्या गळ्याचे ताईत होणारी चौथी पिढी. न थकता न थांबता फक्त कामाला प्रेम करणारे महामानवांच्या विचारांचे पाईक होऊन “तूच हो तुझ्या जीवनाचा शिल्पकार” ह्या ब्रीदवाक्याला सैदव मनात कोरून,काम करणारे आमचे शिंदे कुटुंब. भजन,कवाली,गायन ,चित्रपट गीते,आता चित्रपटात अभिनेता ते डॉक्टर डिग्री दवाखाने ते आता उद्योग जगात पदार्पण करत शिंदे परिवाराचं पाहिलं पेट्रोल पंप. वेळापूर (पंढरपुर)येथे सुरू झालं. आता विषय पंपावर

छत्रपती शिवबा ,महात्मा जोतीबा,अण्णा भाऊ,ते अन्य महात्म्यांच्या विचाराना आदर्श मानले म्हणूनच आमचा उत्कर्ष होत आहे.रसिक माय बापाने भर भरून प्रेम दिले त्या प्रेमाची परतफेड आम्हाला कधीच करता येणार नाही.आम्ही हर्षद आदर्श उत्कर्ष असेच मेहनत करत राहू पण त्याल साथ हवी तुमच्या आशिर्वादाची. क्यूकी ज़िंदगी कि असली उड़ान अभी बाकी है, जिंदगी के कई इम्तेहान अभी बाकी है। अभी तो नापी है मुट्ठी भर ज़मीन हमने, अभी तो सारा आसमान बाकी है.

उत्कर्षच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करत शिंदे कुटुंबीयांचं अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, उत्कर्ष 'बिग बॉस मराठी ३'मध्ये सहभागी झाला होता. या पर्वातील तो टॉप ५ स्पर्धकांपैकी एक होता. लवकरच उत्कर्ष 'वेडात मराठे वीर दौडले सात' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Web Title: adarsh shinde utkarsh shinde new business open petrol pump in pandharpur on diwali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.