"निरोप घेतो देवा आम्हा आज्ञा असावी..", लाडक्या बाप्पाच्या विसर्जनाला मराठमोळी अभिनेत्री झाली भावूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2023 12:43 IST2023-09-28T12:41:15+5:302023-09-28T12:43:24+5:30

मराठमोळी अभिनेत्री लाडक्या बाप्पाला निरोप देताना भावूक झाली आहे.

Actress Tejaswini pandit got emotional while saying goodbye to her beloved bappa | "निरोप घेतो देवा आम्हा आज्ञा असावी..", लाडक्या बाप्पाच्या विसर्जनाला मराठमोळी अभिनेत्री झाली भावूक

"निरोप घेतो देवा आम्हा आज्ञा असावी..", लाडक्या बाप्पाच्या विसर्जनाला मराठमोळी अभिनेत्री झाली भावूक

गेले १० दिवस संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळत होता. अनंत चतुर्दशी दिवशी लाडक्या बाप्पाला निरोप देताना प्रत्येकजण भावूक झाला आहे. याला सेलिब्रेटी तरी कसे अपवाद असतील. मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडित बाप्पाला निरोप देताना काहीशी भावूक झाली आहे. तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.   

तेजस्विनीने सोशल मीडियावर  गणपती बाप्पासमोर कान पकडून बसलेला एक फोटो शेअर केला आहे. ''निरोप घेतो देवा आम्हा आज्ञा असावी चुकले अमुचे काही त्याची क्षमा असावी ! गणपती चालले गावाला, चैन पडेना आम्हाला'' असं कॅप्शन तिने या फोटोसोबत दिलं आहे. गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या अशा कमेंट्स तेसस्विनीच्या या फोटोवर चाहत्यांनी केल्या आहेत. 

पुण्यातील मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीत तेजस्विनी पंडित सहभागी झाली आहे. कलावंत ढोल ताशा पथकात ती दरवर्षी सहभागी होते. तेजस्विनी प्रमाणे अनेक मराठी कलाकार याचा भाग आहेत.  आपल्या कामातून वेळ काढून तालीम करतात आणि मिरवणुकीत सहभागी होतात.

आपल्या दमदार अभिनयानं तेजस्विनी पंडितने प्रेक्षकांच्या मनात एक हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. चित्रपटांपासून वेबसीरिजपर्यंत सर्वच क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला आहे. आईच्या पावलावर पाऊल टाकत तेजस्विनी अभिनयाच्या दुनियेत आली आणि इथेच रमली. तेजस्विनीने वेबसीरिज्या माध्यमातून निर्मीती क्षेत्रातही पदार्पण केलं आहे.

Web Title: Actress Tejaswini pandit got emotional while saying goodbye to her beloved bappa