बोल्डनेसच्या बाबतीत ही मराठीमोळी अभिनेत्री देते भल्याभल्यांना टक्कर, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2021 07:00 IST2021-02-03T07:00:00+5:302021-02-03T07:00:03+5:30

सोशल मीडियाच्या माध्यमातून ती स्वतःचे हॉट आणि ग्लॅमरस फोटो आपल्या फॅन्ससह शेअर करत असते.

Actress sanskruti balgude share her glamour's photoshoot | बोल्डनेसच्या बाबतीत ही मराठीमोळी अभिनेत्री देते भल्याभल्यांना टक्कर, पाहा फोटो

बोल्डनेसच्या बाबतीत ही मराठीमोळी अभिनेत्री देते भल्याभल्यांना टक्कर, पाहा फोटो

अभिनेत्री संस्कृती बालगुडे सोशल मीडियावर बरीच अ‍ॅक्टिव्ह असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती स्वतःचे हॉट आणि ग्लॅमरस फोटो आपल्या फॅन्ससह शेअर करत असते. नेहमीच आपल्या या हॉट फोटोंच्या माध्यमातून तिने रसिकांच्या काळजाचा ठाव घेते.याच फोटोंच्या यादीत संस्कृतीच्या आणखी एका नव्या फोटोंची भर पडली आहे. संस्कृतीने नुकतेच सोशल मीडियावर एक फोटोशूट शेअर केले आहे. यात संस्कृती खूप हॉट आणि ग्लॅमरस दिसतेय. संस्कृती बालगुडेने लाल स्कर्ट टॉपमधले फोटोशूट शेअर करत सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. या फोटोंमधील संस्कृतीच्या अदा कुणालाही घायाळ करतील अशाच आहेत.  तिच्या या फोटोवर फॅन्सकडून कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव करण्यात आला आहे. 

'सांगतो ऐका' या सिनेमानंतर निवडुंग, शिव्या, एफयु असे संस्कृतीचे विविध सिनेमा रुपेरी पडद्यावर झळकले आहेत.संस्कृती शेवटची 'सर्व लाइन व्यस्त आहेत' या चित्रपटात दिसली होती. लवकरच ती  '८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी! या सिनेमात दिसणार आहे.

संस्कृतीसह या सिनेमात अभिनेता शुभंकर तावडे,शर्वाणी पिल्लई, संजय मोने, आनंद इंगळे, ,राधिका हर्षे - विद्यासागर, अश्विनी कुलकर्णी, विजय पटवर्धन, चिन्मय संत, डॉ .निखिल राजेशिर्के अशी दमदार स्टारकास्ट आहे. अभिनेता पुष्कर श्रोत्री पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसेल. वैभव जोशी यांचे गीतलेखन आणि अवधून गुप्ते संगीत दिग्दर्शन करत आहेत.

Web Title: Actress sanskruti balgude share her glamour's photoshoot