सई ताम्हणकरने केलं स्टायलिश फोटोशूट, फोटोंना मिळतेय चाहत्यांची पसंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2020 15:46 IST2020-12-29T15:28:02+5:302020-12-29T15:46:11+5:30

बोल्ड आणि बिनधास्त अशी सईची ओळख आहे.

Actress sai tamhankar did a stylish photoshoot | सई ताम्हणकरने केलं स्टायलिश फोटोशूट, फोटोंना मिळतेय चाहत्यांची पसंती

सई ताम्हणकरने केलं स्टायलिश फोटोशूट, फोटोंना मिळतेय चाहत्यांची पसंती

फॅशन आयकॉन म्हणून अभिनेत्री सई ताम्हणकर ओळखली जाते. सई सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते. विविध गोष्टी सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असते. आपल्या स्टायलिश आणि ग्लॅमरस फोटोमुळे ती चर्चेत असते.  बोल्ड आणि बिनधास्त अशी सईची ओळख आहे. सईने नुकतेच इन्स्टाग्रामवर आपले नवं फोटोशूट शेअर करुन सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. सिल्वर रंगाच्या शॉर्टड्रेसमध्ये सई खूपच ग्लॅमरस दिसतेय. फोटोत वेगवेगळ्या पोझ तिने दिल्या आहेत. सई ताम्हणकर हिचे फोटो पाहून तिचे चाहते लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

सई सध्या 'महाराष्ट्राची हास्य जत्रा' या शोमध्ये जजच्या भूमिकेत आहे. वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर ती लवकरच कलरफुल या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत ललित प्रभाकर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. यात सई मीराच्या भूमिकेत पहायला मिळणार आहे. ही एक लव्हस्टोरी आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शक प्रकाश कुंटे त्याच्या या नवीन जोडी विषयी सांगितले की, 'ललित आणि सई हे दोघेही गुणी कलाकार आहेत, दोघांचे काम मी पाहिले आणि अनुभवले सुद्धा आहे, या सगळ्यात 'करण मीरा' हे दोघेच साकारू शकतील या बाबत मी ठाम होतो. सई आणि ललित या दोघांची पात्र जरी वेगळी असली तरी ती प्रेक्षकांना भावतील हा माझा विश्वास आहे.

Web Title: Actress sai tamhankar did a stylish photoshoot