अभिनेत्री ऋतुजा बागवे रसिकांच्या भेटीला, साकारणार महत्त्वपूर्ण भूमिका !

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2019 12:48 IST2019-12-30T12:45:55+5:302019-12-30T12:48:44+5:30

ऋतुजाने शहीद भाई कोतवाल सारख्या इतिहासावर आधारित चित्रपटातही ती आपल्या अभिनयाचं नाणं खणखणीत वाजवेल यात काहीच शंका नाही.

Actress Rutuja Bagwe New Marathi Movie | अभिनेत्री ऋतुजा बागवे रसिकांच्या भेटीला, साकारणार महत्त्वपूर्ण भूमिका !

अभिनेत्री ऋतुजा बागवे रसिकांच्या भेटीला, साकारणार महत्त्वपूर्ण भूमिका !

मराठमोळी ऋतुजा बागवे सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या खासगी आणि सिनेमा तसंच आगामी प्रोजेक्टबद्दलची माहिती ती फॅन्ससह शेअर करते. ती आपले फोटोसुद्धा फॅन्ससह शेअर करत असते आणि त्यांच्याशी संवादही साधत असते. लवकरच ती वेगळ्या भूमिकेतू रसिकांच्या भेटीला येणार आहे. खुद्द ऋतुजाने सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांना सांगितली आहे. 


नाटक आणि टीव्ही मालिकांतून आपल्या अभिनयाची छाप उमटवलेली ऋतुजा बागवे एका महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे. 'शहीद भाई कोतवाल' या चित्रपटात तिनं भाई कोतवालांच्या पत्नीची म्हणजेच इंदू कोतवालची  भूमिका साकारली आहे. एकनाथ देसले आणि पराग सावंत यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटातील भूमिकांमध्ये उत्तमोत्तम कलाकार दिसणार आहेत. त्यात ऋतुजाची भूमिका लक्षवेधी ठरणार आहे.

 
ऋतुजानं आतापर्यंत मालिका आणि नाटकांतून आपलं अभिनय कौशल्य दाखवलं आहे. आता शहीद भाई कोतवाल सारख्या इतिहासावर आधारित चित्रपटातही ती आपल्या अभिनयाचं नाणं खणखणीत वाजवेल यात काहीच शंका नाही. लवकरच हा चित्रपट प्रदर्शित होत  असून अद्याप प्रदर्शनाची तारिख ठरलेली नाही. त्यामुळे हा सिनेमा पाहण्यासाठी रसिकांना आणखीन वाट पहावी लागणार आहे.

Web Title: Actress Rutuja Bagwe New Marathi Movie