अभिनेत्री प्रार्थना बेहेरेची नवी इनिंग; मुंबईत खरेदी केलं नवीन ऑफिस

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2023 19:47 IST2023-12-03T19:45:07+5:302023-12-03T19:47:34+5:30

प्रार्थनाने मुंबईतील अंधेरी परिसरात नवीन ऑफिस घेतलं आहे. 

Actress Prathana Behere's Bought a new office in Mumbai | अभिनेत्री प्रार्थना बेहेरेची नवी इनिंग; मुंबईत खरेदी केलं नवीन ऑफिस

अभिनेत्री प्रार्थना बेहेरेची नवी इनिंग; मुंबईत खरेदी केलं नवीन ऑफिस

प्रार्थना बेहेरे ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेमुळे ती घराघरांत पोहोचली. ‘मितवा’, ‘मिस्टर अँड मिसेस सदाचारी’, ‘कॉफी आणि बरंच काही’ अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये प्रार्थनाने काम केलं आहे. अभिनयाबरोबरच ती सोशल मीडियावरदेखील सक्रिय असते. आता प्रार्थनाने एक नवीन इनिंग सुरू केली आहे. प्रार्थनाने मुंबईतील अंधेरी परिसरात नवीन ऑफिस घेतलं आहे. 

पार्थनाने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती पती अभिषेकसोबत  नवीन ऑफिसची पूजा करताना पाहायला मिळत आहे. पारंपरिक पद्धतीने पूजा करुन पार्थनाने नवऱ्याच्या साथीने नव्या ऑफिसमध्ये प्रवेश केला.  या व्हिडीओला तिने “फक्त कृतज्ञता…” असं कॅप्शन दिलं आहे. तर प्रार्थनाच्या नव्या ऑफिसचं नाव ‘रेड बुल स्टुडिओ’ असं आहे.

नुकतेच प्रार्थनाने तिची नणंद पल्लवी भिडेच्या साथीने साड्यांचा नवा ब्रॅन्ड सुरू केला. ‘वी नारी’ (WeNaari) असं त्यांच्या नवीन ब्रॅन्डचं नाव आहे. एकता कपूरच्या 'पवित्र रिश्ता' या मालिकेच्या माध्यमातून तिने मनोरंजनसृष्टीत पाऊल ठेवलं होतं. पहिल्याच मालिकेने ती लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली होती.  तर प्रार्थनाने २०१८ मध्ये लग्न झाल्यावर काही काळ इंडस्ट्रीमधून ब्रेक घेतला होता. त्यानंतर गेल्यावर्षी ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेतून अभिनेत्रीने छोट्या पडद्यावर पुनरागमन केलं. या मालिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला.

Web Title: Actress Prathana Behere's Bought a new office in Mumbai