समुद्र किनारी अभिनेत्री प्रार्थना बेहरेने केलं ग्लॅमरस फोटोशूट, चाहते झाले घायाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2020 17:16 IST2020-12-01T17:10:29+5:302020-12-01T17:16:21+5:30

प्रार्थना बेहरे सोशल मीडियावर खूप सक्रीय असते.

Actress prarthana behera did a glamorous photoshoot | समुद्र किनारी अभिनेत्री प्रार्थना बेहरेने केलं ग्लॅमरस फोटोशूट, चाहते झाले घायाळ

समुद्र किनारी अभिनेत्री प्रार्थना बेहरेने केलं ग्लॅमरस फोटोशूट, चाहते झाले घायाळ

प्रार्थना बेहरेने कॉफी आणि बरंच काही, मिस्टर एंड मिसेस सदाचारी, मितवा, मस्का अशा विविध मराठी सिनेमात काम केलं आहे. लवकरच प्रार्थना छूमंतर या मराठी सिनेमात दिसणार आहे. यात तिच्यासोबत रिंकू राजगुरू, सुव्रत जोशी आणि ऋषी सक्सेना मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. काही महिन्यांपूर्वी प्रार्थना छूमंतर सिनेमाच्या शूटिंगसाठी लंडनला गेली होती.

 प्रार्थना बेहरे सोशल मीडियावर खूप सक्रीय असते. ती सोशल मीडियावर फोटो व व्हिडिओ शेअर करत असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांना आगामी प्रोजेक्टबद्दल माहिती देत असते. नुकतेच प्रार्थनाने तिचे लेटेस्ट फोटोशूट इन्स्टाग्रामवर शेअर केलं आहे.

या फोटोंमध्ये प्रार्थना समुद्र किनारी वेगवेगळ्या पोझेस देताना दिसतेय. पिस्ता रंगाच्या वनपीसमध्ये ती ग्लॅमरस दिसतेय. चाहत्यांनी ही तिच्या या फोटोशूटला लाईक्सच्या माध्यमातून पसंती दिली आहे.

प्रार्थनाने आपल्या करिअरची सुरुवात छोट्या पडद्यावरुन केली. याआधी तिने 'पवित्र रिश्ता' मालिकेतून छोटा पडदा गाजवला. त्यानंतर 'जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा' या मराठी सिनेमातून एंट्री मारत रसिकांची मनं जिंकली. मराठी चित्रपटसृष्टीत स्वतःचं अढळ स्थान निर्माण केले आहे. रुपेरी पडद्यावर मराठीतील दिग्गज अभिनेत्यांसह प्रार्थना बेहरेची केमिस्ट्री चांगलीच जुळली.

Web Title: Actress prarthana behera did a glamorous photoshoot