"तुला पाहून खूप असूया वाटली"; 'नाच गं घुमा' पाहून अभिनेत्रीची नम्रताविषयी खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2024 09:57 IST2024-05-08T09:57:35+5:302024-05-08T09:57:54+5:30

बिग बॉस मराठी फेम अभिनेत्री नेहा शितोळने नाच गं घुमा पाहून सिनेमातील 'आशाताईं'बद्दल एक खास पोस्ट लिहिलीय (naach ga ghuma, namrata sambherao)

actress neha shitole post for naach ga ghuma actress namrata sambherao | "तुला पाहून खूप असूया वाटली"; 'नाच गं घुमा' पाहून अभिनेत्रीची नम्रताविषयी खास पोस्ट

"तुला पाहून खूप असूया वाटली"; 'नाच गं घुमा' पाहून अभिनेत्रीची नम्रताविषयी खास पोस्ट

'नाच गं घुमा' सिनेमा सध्या चांगलाच गाजतोय. या सिनेमात मुक्ता बर्वे आणि  नम्रता संभेराव या जोडीला प्रेक्षकांचं चांगलंच प्रेम मिळतंय. 'नाच गं घुमा' पाहून अनेक लोकं आणि कलाकार सिनेमाचं कौतुक करत आहेत. शिवाय नम्रता - मुक्ताच्या अभिनयालाही पसंती देत आहेत. 'नाच गं घुमा' पाहिल्यावर बिग बॉस फेम मराठी अभिनेत्री नेहा शितोळेने तिची मैत्रीण नम्रताबद्दल एक खास पोस्ट लिहिलीय. काय म्हणाली नेहा बघा.

नेहाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर नम्रताचा 'नाच गं घुमा' सिनेमातला फोटो पोस्ट करुन लिहिलंय की,  "माझ्यासाठी ह्या माझ्या जुन्या आणि जाणत्या मैत्रिणीने हा चित्रपट
खाल्लाय... नम्रता तू कमाल होतीसच आता ते जगालाही कळतंय इतकंच... खूप वर्षांनी एखाद्या अभिनेत्रीला बघून खूप असूया वाटली... तिला
मिळालेल्या कामाबद्दल नाही तीने ते कसं केलंय हे बघून..."

नेहाने पुढे लिहिलंय की, "अत्यंत मनापासून आनंद झाला असं पात्र बघून आणि अभिमान वाटला साकारणारी अशी गुणवंत अभिनेत्री बघून... नमा, खूप भारी वाटतंय मला की तुला मी मैत्रीण म्हणू शकते... So so so proud of you..." अशाप्रकारे नेहाने नम्रताचं कौतुक केलंय. 'नाच गं घुमा' सिनेमा सध्या थिएटरमध्ये चांगलाच धुमाकूळ घालतोय. अवघ्या काहीच दिवसांत सिनेमाने ५ कोटीहून जास्त गल्ला जमवला आहे.

Web Title: actress neha shitole post for naach ga ghuma actress namrata sambherao