मिथिला पालकरवर कोसळला दुःखाचा डोंगर, लाडक्या आजीचं निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2025 10:33 IST2025-05-23T10:31:36+5:302025-05-23T10:33:28+5:30

मिथिला पालकरच्या आजीचं निधन झाल्याने तिने सोशल मीडियावर भावुक पोस्ट करुन आजीला श्रद्धांजली वाहिली आहे

actress Mithila Palkar grandmother passed away actress emotional post to her | मिथिला पालकरवर कोसळला दुःखाचा डोंगर, लाडक्या आजीचं निधन

मिथिला पालकरवर कोसळला दुःखाचा डोंगर, लाडक्या आजीचं निधन

मराठीसोबत हिंदी मनोरंजन विश्व गाजवणारी प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे मिथिला पालकर.मिथिला पालकरवर (mithila palkar) दुःखाचा डोंगर कोसळला असून तिच्या लाडक्या आजीचं निधन झालं आहे. मिथिलाने सोशल मीडियावर आजीचा फोटो पोस्ट करुन ही दुःखद बातमी सर्वांसोबत शेअर केली. २०२२ मध्ये मिथिलाच्या आजोबांचंही निधन झालं होतं. आता आजीचं निधन झाल्याने मिथिलाने भावुक पोस्ट शेअर करत आजीला श्रद्धांजली वाहिली आहे.

मिथिलाने आजीसाठी भावुक

मिथिलाने आजीसोबतचा फोटो पोस्ट करुन सोशल मीडियावर लिहिलंय की, "तिच्याशिवाय हे जग आहे याची मी कल्पना करु शकत नाही. मला थोडा वेळ लागेल. माझी सुरक्षाकवच, माझी शांतता आणि माझा आत्मा. रेस्ट वेल, मम्मा!" अशा शब्दात मिथिलाने आजीला श्रद्धांजली वाहिली आहे. मिथिलाने ही दुःखद बातमी शेअर करताच मिथिलाच्या चाहत्यांनी आणि सेलिब्रिटींनी तिच्या आजीला श्रद्धांजली वाहिली आहे. 

मिथिला गेली अनेक वर्ष तिच्या आजी-आजोबांसोबत मुंबईत राहत आहे. मिथिला अनेकदा तिच्या आजी-आजोबांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असायची. मिथिलाचं तिच्या आजी-आजोबांवर खूप प्रेम होतं. मिथिला कधी आजीसोबत जेवण बनवतानाही दिसायची. मिथिलाच्या आयुष्यातून आजी-आजोबांचं छत्र हरपल्याने तिला प्रचंड दुःख झालंय. मिथिलाचे मित्र-मैत्रिणी या कठीण काळात तिला आधार देत आहेत.

Web Title: actress Mithila Palkar grandmother passed away actress emotional post to her

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.