मराठी सिनेइंडस्ट्रीवर हा चिमुरडा गाजवतोय अधिराज्य, त्याची आई आहे ही प्रसिद्ध अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2021 07:00 IST2021-05-01T07:00:00+5:302021-05-01T07:00:02+5:30

अभिनेता असण्यासोबतच तो हा खूप चांगला लेखक आणि दिग्दर्शकही आहे.

Actor virajas kulkarni share his childhood photo on social media | मराठी सिनेइंडस्ट्रीवर हा चिमुरडा गाजवतोय अधिराज्य, त्याची आई आहे ही प्रसिद्ध अभिनेत्री

मराठी सिनेइंडस्ट्रीवर हा चिमुरडा गाजवतोय अधिराज्य, त्याची आई आहे ही प्रसिद्ध अभिनेत्री

'माझा होशील ना ही' मालिका सुरू झाल्यापासूनच या मालिकेला प्रेक्षकांची खूपच चांगली पसंती मिळत आहे. या मालिकेची कथा प्रेक्षकांना चांगलीच आवडत आहे. या मालिकेतील नायक आणि नायिकाच्या केमिस्ट्रीची तर चांगलीच चर्चा रंगली आहे.

या मालिकेतील नायक विराजस कुलकर्णी प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा मुलगा आहे. विराजस सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. तो त्याचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतो. अलीकडेच त्यांना सोशल मीडियावर त्याच्या लहानपणीचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. फोटोत तो खूपच क्युट दिसतोय. विराजच्या या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय. 

 विराजस हा खूप चांगला लेखक आणि दिग्दर्शक असून त्याने हॉस्टेल डेज या चित्रपटात काम केले होते. विराजस आणि शिवानी रांगोळे यांच्या अफेअरची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर रंगली आहे. विराजस आणि शिवानीची ओळख एका नाटकादरम्यान झाली होती. शिवानीने विराजसच्या 'डावीकडून चौथी बिल्डिंग' या नाटकात काम केलं होत. तेव्हापासून त्या दोघांची ओळख झाली होती.

शिवानी सध्या 'सांग तू आहेस ना' या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे. या व्यतिरिक्त शिवानीने ‘डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानवाची गौरव गाथा’ या मालिकेत बाबासाहेबांची पत्नी रमाबाई आंबेडकर यांची भूमिका साकारली आहे.

 

Web Title: Actor virajas kulkarni share his childhood photo on social media