अभिनेता गश्मीर महाजनी दिसणार अ‍ॅक्शन सीरिज 'श्रीकांत बशीर'मध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2020 03:16 PM2020-12-10T15:16:40+5:302020-12-10T15:18:09+5:30

'श्रीकांत बशीर' हा अ‍ॅक्‍शन पॅक ड्रामा आहे.

Actor Gashmir Mahajani will be seen in the action series 'Srikant Bashir' | अभिनेता गश्मीर महाजनी दिसणार अ‍ॅक्शन सीरिज 'श्रीकांत बशीर'मध्ये

अभिनेता गश्मीर महाजनी दिसणार अ‍ॅक्शन सीरिज 'श्रीकांत बशीर'मध्ये

googlenewsNext

मराठी चित्रपटसृष्टीतील हॅण्डसम अभिनेता गश्मीर महाजनी लवकरच एका अ‍ॅक्शन सीरिजमध्ये झळकणार आहे. हा अ‍ॅक्शन सीरिजचे नाव श्रीकांत बशीर असून सोनी लिव्हवर प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. 'श्रीकांत बशीर' हा अ‍ॅक्‍शन पॅक ड्रामा आहे. ही सीरिज दोन अधिकारी श्रीकांत आणि बशीर यांच्‍या अवतीभोवती फिरते. ते शहराचे घातक विषाणूपासून संरक्षण करण्‍यासाठी काळाविरोधात लढतात. या सीरिजमध्‍ये गश्‍मीर महाजनी व युधिष्ठिर सिंग यांनी प्रमुख भूमिका साकारल्‍या आहेत.  


अनेक कलाकार स्‍टण्‍ट्स व अ‍ॅक्‍शन सीक्‍वेन्‍सेससाठी बॉडी डबलचा उपयोग करण्‍याला प्राधान्‍य देतात, तर काही कलाकार अधिक मेहनत घेऊन स्‍वत:हून स्‍टण्‍ट्स करतात. आगीशी संबंधित सीक्‍वेन्‍स ते डुप्लिकेटचा वापर केल्याशिवाय दुमजली इमारतीवरून उड्या मारण्‍यापर्यंत आणि बाइक चेस सीक्‍वेन्‍स करण्‍यापर्यंत सर्व अ‍ॅक्‍शन्‍स दोन्‍ही कलाकारांनी स्‍वत:हून केले आहेत. ज्‍यामुळे 'श्रीकांत बशीर' ही पाहिलीच पाहिजे अशी अ‍ॅक्‍शन सीरिज आहे. या दोन कलाकारांव्‍यतिरिक्‍त एसओटी येथील आयटी तज्ञ रवीनाची भूमिका साकारणारी पूजा गोर देखील शोमध्‍ये काही धाडसी स्टंट्स करताना पाहायला मिळणार आहे. 


श्रीकांतची भूमिका साकारणारा गश्‍मीर महाजनी या अनुभवाबाबत बोलताना म्‍हणाला, ''एक सीन होता, ज्‍यामध्‍ये युधिष्ठिर आणि मला दुमजली इमारतीवरून उडी मारायची होती. या सीनमध्‍ये मानसिक व शारीरिक संतुलन राखणे गरजेचे होते, ज्‍यामुळे आम्‍हाला आधी काहीशी भिती वाटली. पण सीनमध्‍ये वास्‍तविकतेची भर करण्‍यासाठी आम्‍ही सर्व सुरक्षितता व खबरदारींसह हार्नेसचा आधार न घेता सीन करण्‍याचे ठरवले. सुदैवाने आम्‍हा दोघांना कोणतीच दुखापत झाली नाही आणि सीन देखील उत्तम झाला. ज्‍यामुळे आम्‍हाला पडद्यावर हा सीन पाहताना खूप अभिमान वाटेल.'' 


श्रीकांत बशीर वेबसीरिजमध्ये गश्‍मीर महाजनी व युधिष्ठिर सिंग व्‍यतिरिक्‍त 'श्रीकांत बशीर'मध्‍ये पूजा गोर, मंत्रा, अष्मिता जग्‍गी असे प्रतिभावान कलाकार देखील आहेत. 

Web Title: Actor Gashmir Mahajani will be seen in the action series 'Srikant Bashir'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.