Prasad Oak : "हे वर्ष माझ्यासाठी धर्मवीर..", प्रसाद ओकची 'ती' पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2022 16:58 IST2022-12-27T16:52:54+5:302022-12-27T16:58:49+5:30

प्रसादने शेअर केलेल्या पोस्ट सोशल मीडियावर लगेच व्हायरल होतात. अशीच एक त्याची पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.

Actor-director Prasad oak new post viral on social media | Prasad Oak : "हे वर्ष माझ्यासाठी धर्मवीर..", प्रसाद ओकची 'ती' पोस्ट चर्चेत

Prasad Oak : "हे वर्ष माझ्यासाठी धर्मवीर..", प्रसाद ओकची 'ती' पोस्ट चर्चेत

प्रसाद ओक (Prasad oak) हे नाव सध्याच्या घडीला कोणत्याही व्यक्तीसाठी नवीन नाही. दर्जेदार अभिनयामुळे ओळखला जाणार प्रसाद सध्या त्याच्या उत्तम दिग्दर्शकीय कौशल्यामुळे चर्चेत येत आहे. दर्जेदार चित्रपटांची निर्मिती करणारा प्रसाद सोशल मीडियावर कमालीचे सक्रीय आहेत. प्रसादने शेअर केलेल्या पोस्ट सोशल मीडियावर लगेच व्हायरल होतात. अशीच एक त्याची पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. 

प्रसाद ओकचा नुकताच 'वाग्यज्ञे" पुरस्कारानं सन्मान करण्यात आला आहे. त्यासंबंधीची पोस्ट आणि पुरस्कार स्विकारतानाचे फोटो अभिनेत्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. पुण्यात हा पुरस्कार सोहळा संपन्ना झाला.

प्रसादची पोस्ट 
आज साहित्यिक कलावंत प्रतिष्ठान चा "वाग्यज्ञे" पुरस्कार मला मा. वीणाताई देव यांच्या हस्ते मिळाला. माझ्यासोबत सुप्रसिद्ध लेखक/कवी श्री इंद्रजित भालेराव यांनाही हा पुरस्कार मिळाला. आमचे मित्र राजेश दामले यांनी घेतलेली माझी मुलाखत सुद्धा छान रंगली. प्रतिष्ठान चे आणि दिलीपभाऊ बराटे यांचे मनःपूर्वक आभार...!!!

या वर्षातला हा शेवटचा पुरस्कार. हे वर्ष माझ्यासाठी #धर्मवीर आणि #चंद्रमुखी मुळे अत्यंत संस्मरणीय ठरलं.
या दोन्ही चित्रपटांच्या संपूर्ण टीमचे सुद्धा मनःपूर्वक आभार. या वर्षीच्या सर्व पुरस्कारांमुळे नवीन वर्षात अजून उत्तम काम करण्याची ताकद मिळाली. बाप्पाचा आशीर्वाद आणि रसिकांचं प्रेम कायम पाठीशी राहो एवढीच प्रार्थना...!!!!

प्रसादचे सेलिब्रेटींसह अनेक चाहत्यांनी अभिनंदन केलं आहे. अभिनेता प्रसाद ओक हा मराठी इंडस्ट्रीतला सुप्रसिद्ध अभिनेता आहे. अनेक सिनेमे आणि मालिका करत त्याने प्रेक्षकांच्या मन स्वत:चं स्थान निर्माण केलयं. नुकताच तो ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला. या सिनेमात प्रसादनं साकारलेले आनंद दिघे लोकांना भावले. प्रसादच्या ‘धर्मवीर’ या सिनेमातील भूमिकेचं खूपच कौतुक झालं.


 

Web Title: Actor-director Prasad oak new post viral on social media