अभिनेता अमेय वाघनं बायकोच्या वाढदिवसानिमित्त लिहिली खास पोस्ट, म्हणाला- 'तुझे फ्युचर प्लान ऐकून...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2023 13:18 IST2023-06-19T13:14:25+5:302023-06-19T13:18:48+5:30

अमेय अनेकवेळा पत्नीसोबतचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असतो.

Actor Amey Wagh wrote a special post for his wife's birthday | अभिनेता अमेय वाघनं बायकोच्या वाढदिवसानिमित्त लिहिली खास पोस्ट, म्हणाला- 'तुझे फ्युचर प्लान ऐकून...

अभिनेता अमेय वाघनं बायकोच्या वाढदिवसानिमित्त लिहिली खास पोस्ट, म्हणाला- 'तुझे फ्युचर प्लान ऐकून...

अभिनेता अमेय वाघ (Amey Wagh ) याची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेतून घराघरातल्या तरूणाईला अमेय वाघची ओळख झाली. पुढे फास्टर फेणे, मुरांबा यासारख्या त्याच्या मराठी सिनेमांनी प्रेक्षकांना वेड लावलं आणि नंतर वेबसीरिजमधून त्याने हिंदी मनोरंजन क्षेत्रातही पदार्पण केलं. अमेय जितका उत्तम अभिनेता आहे, तितका उत्तम विनोदबुद्धी असलेला माणूस आहे. त्याच्या सोशल मीडियावरील पोस्ट व्हायरल होतात. त्याने बायकोसाठी लिहिलेली पोस्ट सध्या चर्चेत आलीय.

अमेयनं त्याची बायको साजिरी हिच्यासोबतचा एक फोटो शेअर करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. अमेयने लिहिले, प्रिय साजिरी…तुझे future plans ऐकून माझी झोप उडते … पण तुझ्याच मांडीवर डोकं ठेवून शांत झोप लागते ! Killer Drummer, High Tea Enthusiast, Compulsive Planner, Bathroom Whistler, Mother of Cats and My Dream Lover…….. wish you a happy birthday. त्याच्या या पोस्टवर चाहत्यांसह सेलिब्रेटींनीही साजिरीला वाढदिवसांच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

अमेय वाघ 2017 साली विवाह बंधनात अडकला. 13 वर्षांच्या रिलेशनशीपनंतर त्याने साजिरी देशपांडेशी लग्नाचा निर्णय घेतला. अमेय आणि साजिरीची लव्हस्टोरी पुण्याच्या कॉलेजमध्ये सुरु झाली. साजिरी अमेयच्या कॉलेजमधील नाटकाची तालीम पाहायला यायची. अमेयला पाहिल्यानंतर साजिरी त्याच्या प्रेमात पडली आणि इथून त्यांची लव्हस्टोरी सुरु झाली. अमेयची पत्नी साजिरी दिसायला खूपच सुंदर आहे. अमेय तिच्यासोबतचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असतो. 

Web Title: Actor Amey Wagh wrote a special post for his wife's birthday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.