अभिनय बेर्डेने शेअर केली ही स्पेशल पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2018 01:05 PM2018-10-02T13:05:37+5:302018-10-02T13:09:47+5:30

मराठी फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात अभिनयला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. 

Abhimay Barde has shared special post | अभिनय बेर्डेने शेअर केली ही स्पेशल पोस्ट

अभिनय बेर्डेने शेअर केली ही स्पेशल पोस्ट

googlenewsNext
ठळक मुद्देअभिनयला मिळाला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कारअभिनयने 'ती सध्या काय करते' या सिनेमातून केले चित्रपटसृष्टीत पदार्पणअभिनयचा आगामी सिनेमा अशी ही आशिकी


आपल्या विनोदी भूमिकांनी नेहमीच प्रेक्षकांची मने जिंकणारा 'लक्ष्या' म्हणजेच लक्ष्मीकांत बेर्डे. मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांच्या आजही मनात कायम आहे. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत लक्ष्मीकांत बेर्डेंचा मुलगा अभिनय बेर्डे यानेही चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. 
त्याने 'ती सध्या काय करते' या सिनेमातून अभिनय क्षेत्रात एन्ट्री केली. या सिनेमातील अभिनयच्या कामाचे सगळीकडून खूप कौतूक झाले. नुकताच पार पडलेल्या मराठी फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात अभिनयला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. 
चित्रपटसृष्टीतील मानाचा समजला जाणार फिल्मफेअर पुरस्कार कलाकारांसाठी अत्यंत महत्वाचा असतो. हिंदीप्रमाणेच मराठीतही आता फिल्मफेअर पुरस्कार सोहळा आयोजित केला जातो. यावेळी या सोहळ्याचे चौथे वर्ष होते. 'ती सध्या काय करते' या चित्रपटासाठी अभिनयला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे. लक्ष्मीकांत बेर्डेलाही १९८५ साली सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. अभिनयने लक्ष्मीकांत बेर्डेंना मिळालेली फिल्मफेअर ट्रॉफी आणि त्याला मिळालेल्या ट्रॉफीचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. 'लाईक अ फादर लाईक अ सन' असे कॅप्शन त्याने या फोटोला दिले आहे. 



अभिनयने आई वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून चित्रपटसृष्टीत प्रवेश केला आहे. त्याच्या ती सध्या काय करते या पहिल्याच चित्रपटाला प्रेक्षकांचे चांगलेच प्रेम मिळाले होते. त्याचा अभिनय, नृत्य प्रेक्षकांना चांगलेच भावले होते. आता तो अशी ही आशिकी या चित्रपटात झळकणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाची निर्मिती सचिन पिळगांवकर करणार आहेत. या चित्रपटात त्याच्यासोबत नवोदीत अभिनेत्री हेमल इंगळे दिसणार आहे. या चित्रपटात अभिनयचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळणार आहे. 

Web Title: Abhimay Barde has shared special post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.