गुढीपाडव्याला अभिजीत सावंतचा 'रॉयल' थाट! घरी आली आलिशान BMW; साधला साडेतीन मुहूर्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 19:32 IST2026-03-19T18:30:32+5:302026-03-19T19:32:59+5:30

अभिजीत सावंतने चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे.

Abhijeet Sawant Buys New Bmw X5 Car Gudhi Padwa Celebration Family Video | गुढीपाडव्याला अभिजीत सावंतचा 'रॉयल' थाट! घरी आली आलिशान BMW; साधला साडेतीन मुहूर्त

गुढीपाडव्याला अभिजीत सावंतचा 'रॉयल' थाट! घरी आली आलिशान BMW; साधला साडेतीन मुहूर्त

गुढीपाडवा म्हणजे नव्या सुरुवातीचा...नव्या आशांचा... नव्या यशाचा सण... गुढीपाडवा हा महाराष्ट्रातील एक अत्यंत महत्त्वाचा सण असून तो मराठी नववर्षाचा पहिला दिवस मानला जातो. हिंदू पंचांगानुसार गुढीपाडवा हा हिंदू धर्मातील साडेतीन मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त मानला जातो, त्यामुळे या दिवशी केलेले कोणतेही शुभ कार्य फलदायी ठरते. हा  साडेतीन मुहूर्त साधत आपल्या गोड आवाजाने हिंदी आणि मराठी दोन्ही सिनेसृष्टी गाजवणाऱ्या अभिजीत सावंतने BMW खरेदी केली आहे.

अभिजीत सावंतने चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. त्याने गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर BMW X5 ही महागडी आणि आलिशान कार घरी आणली.  सोशल मीडियावर एक खास व्हिडीओ शेअर करत त्याने ही आनंदाची बातमी दिली. या व्हिडीओमध्ये अभिजीतची पत्नी शिल्पा आणि त्याच्या दोन्ही लाडक्या लेकी नवीन कार घेण्यासाठी शोरूममध्ये पोहोचल्याचे दिसत आहे.

सहकुटुंब केली नव्या गाडीची पूजा
अभिजीतच्या पत्नीने स्वतः नव्या कारची शास्त्रोक्त पूजा केली, तर अभिजीतने नारळ वाढवून नवीन प्रवासाचा श्रीगणेशा केला. "नवी सुरुवात... नवे आशीर्वाद... या सगळ्यासाठी मनापासून कृतज्ञ आहे", अशी भावनिक पोस्ट लिहीत त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. या आलिशान गाडीची किंमत करोडोंच्या घरात असल्याचे बोलले जात आहे.


सेलिब्रिटींकडून शुभेच्छांचा वर्षाव
अभिजीतवर 'बिग बॉस'मधील त्याचे सहकारी मेधा धाडे, जान्हवी किल्लेकर आणि करण सोनावणे यांनी कमेंट्स करत अभिनंदन केले आहे. तसेच संगीत क्षेत्रातील त्याच्या अनेक मित्र-मैत्रिणींनीही त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.  

गायन आणि 'बिग बॉस'मुळे लोकप्रियतेचे शिखर
अभिजीत सावंतने 'मोहब्बतें लुटाऊंगा' पासून ते अलीकडच्या 'सर सुखाची श्रावणी' आणि 'ही चाल तुरू तुरू' या गाण्यांपर्यंत प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले आहे. 'बिग बॉस मराठी ५' मध्ये त्याच्या संयमी स्वभावामुळे त्याने प्रेक्षकांची मने जिंकली होती.  'बिग बॉस मराठी ५'चा उपविजेता तो ठरला होता.

Web Title : अभिजीत सावंत ने गुड़ी पड़वा पर नई BMW के साथ मनाया जश्न।

Web Summary : अभिजीत सावंत ने गुड़ी पड़वा के शुभ अवसर पर एक BMW X5 खरीदी। उन्होंने अपने परिवार के साथ कार की पूजा का एक वीडियो साझा किया। गायक, जो अपने गानों और बिग बॉस के कार्यकाल के लिए जाने जाते हैं, को हस्तियों ने बधाई दी।

Web Title : Abhijeet Sawant celebrates Gudi Padwa with a brand new BMW.

Web Summary : Abhijeet Sawant welcomed a BMW X5 on Gudi Padwa, a propitious day. He shared a video of the car's pooja with his family. Celebrities congratulated the singer, known for his songs and Bigg Boss stint.