शुभ मंगल सावधान..! अभिज्ञा भावे मेहुल पैसोबत अडकली विवाह बंधनात, व्हिडीओ आणि फोटो आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2021 16:30 IST2021-01-06T16:29:46+5:302021-01-06T16:30:02+5:30

तुला पाहते रे फेम अभिनेत्री अभिज्ञा भावे नुकतीच मेहुल पै सोबत लग्नबेडीत अडकली आहे

Abhidnya Bhave ties the Knot With Mehul Pai, video and photos came in front | शुभ मंगल सावधान..! अभिज्ञा भावे मेहुल पैसोबत अडकली विवाह बंधनात, व्हिडीओ आणि फोटो आले समोर

शुभ मंगल सावधान..! अभिज्ञा भावे मेहुल पैसोबत अडकली विवाह बंधनात, व्हिडीओ आणि फोटो आले समोर

तुला पाहते रे फेम अभिनेत्री अभिज्ञा भावे नुकतीच मेहुल पै सोबत लग्नबेडीत अडकली आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत. यावेळी अभिज्ञा भावे आणि मेहुल पैने गुलाबी रंगाचे आउटफिट घातलेले दिसत आहे. अभिज्ञाच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. 

अभिज्ञा भावेचा मेहुल पैसोबत नुकताच विवाह सोहळा पार पडला आहे. या सोहळ्याचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. अभिज्ञा भावेचे चाहते तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. 

यापूर्वी अभिज्ञाच्या मेहंदी सेरेमनीचे फोटो सोशल मीडियावर पहायला मिळाले होते. या सोहळ्याला मराठी सिनेइंडस्ट्रीतील काही कलाकारांनी हजेरी लावली होती. 


अभिज्ञा भावेचा मेहूल पैसोबत ऑक्टोबरमध्ये साखरपुडा पार पडला आहे. अभिज्ञाने 'माझा साखरकारखाना' असे कॅप्शन देत साखरपुड्याचे फोटो शेअर केले होते. मराठी सेलिब्रेटीं आणि चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला होता. कुटुंबीयांच्या उपस्थित अभिज्ञाचा साखरपुडा पार पडला होता.

अभिज्ञाच्या होणाऱ्या पतीचे नाव मेहूल पै आहे. मेहुल पै मुळचा मुंबईचा असून गेल्या १२ वर्षांपासून 'क्लॉकवर्क्स इव्हेंटस प्रायव्हेट लिमिटेड'मध्ये तो ऑपरेशन्स मॅनेजर म्हणून कार्यरत आहे.यातून इव्हेंट मॅनेजमेंट, टाइम मॅनेजमेंट, फायनान्शियल प्लॅनिंगची जबाबदारी तो सांभाळतो आहे.


तुला पाहते रे मालिकेतील मायराच्या भूमिकेतून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री अभिज्ञा भावे सोशल मीडियावर सक्रीय असते.

 

फार कमी लोकांना माहित आहे की चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी अभिज्ञा एअरहॉस्टेस होती. 

Web Title: Abhidnya Bhave ties the Knot With Mehul Pai, video and photos came in front