आमिर खानने रिंकू राजगुरूला दिला होता हा लाखमोलाचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2020 16:00 IST2020-01-24T15:59:20+5:302020-01-24T16:00:04+5:30

आमिर खानने दिलेला सल्ला रिंकूसाठी लाखमोलाचा असल्याचे तिने एका मुलाखतीत सांगितले होते. 

Aamir khan has given valuable suggestion to rinku rajguru | आमिर खानने रिंकू राजगुरूला दिला होता हा लाखमोलाचा सल्ला

आमिर खानने रिंकू राजगुरूला दिला होता हा लाखमोलाचा सल्ला

ठळक मुद्देआमिर खानने रिंकूला सल्ला दिला होता की, कितीही प्रसिद्धी मिळाली तरी त्याने भारावून जायचं नाही.

अभिनेत्री रिंकू राजगुरू गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. याचं कारण म्हणजे तिचा आगामी चित्रपट मेकअप. या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आल्यापासूनच या चित्रपटाविषयी लोकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. रिंकूचे फॅन्स तर या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत. 

सैराट या चित्रपटामुळे रिंकूला अल्पावधीतच लोकप्रियता मिळाली. पहिल्याच चित्रपटातील तिच्या अभिनयाचे चांगलेच कौतुक झाले. या चित्रपटासाठी तिला राष्ट्रीय पुरस्काराने देखील गौरवण्यात आले. रिंकूला आमिर खानने काही वर्षांपूर्वी एक सल्ला दिला होता. हा सल्ला तिच्यासाठी लाखमोलाचा असल्याचे तिने एका मुलाखतीत सांगितले होते. 

रिंकूने फेमसली फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, "आमिर खान यांच्याशी बोलताना माझ्याकडे शब्दच नव्हते. त्यांच्या प्रश्नांना काय उत्तरं देऊ हेच मला कळत नव्हतं. पण मी हिंमत एकवटून त्यांच्याशी बोलले. मला त्यांना भेटल्यानंतर किती छान वाटलं हे मी शब्दांत व्यक्तच करू शकत नाही. त्यांनी माझ्या कामाचं कौतुक केलं. तसेच माझ्याशी बोलताना त्यांनी मला एक खूप छान सल्ला दिला. ते म्हणाले, कितीही प्रसिद्धी मिळाली तरी त्याने भारावून जायचं नाही. मी एका छोट्याशा गावातून आलेय. पण मला प्रेक्षकांना डोक्यावर घेतले. पण मी यापुढे देखील खूप मेहनत घेतली पाहिजे. तसेच प्रामाणिकपणे आणि व्यावसायिक पद्धतीने वागलं पाहिजे असेही त्यांनी मला सांगितले.

मेकअप या चित्रपटात रिंकू राजगुरू आणि चिन्मय उदगीरकर यांच्यासोबतच प्रतीक्षा लोणकर, मिलिंद सफई, राजन ताम्हाणे, सुमुखी पेंडसे, स्वाती बोवलेकर, तेजपाल वाघ यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट ७ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Web Title: Aamir khan has given valuable suggestion to rinku rajguru